(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adivasi Divas 2023 : नाशिक शहरात आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम, मोर्चाची रेलचेल, काँग्रेस नेते थोरात, पटोले यांचीही उपस्थिती
World Tribal Day 2023 In Nashik : आज जागतिक आदिवासी दिन देशभरात साजरा होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज नाशिक शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक संघटनांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले असून एका कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे देखील उपस्थित राहणार आहेत. आज दिवसभरात आदिवासी विकास परिषदेकडून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. सिटूचा मणिपूरच्या निषेधार्थ मोर्चा असून या राजू देसले, जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असणार आहे.
तसेच मणिपूरच्या निषेधार्थ काँग्रेसचा भव्य मोर्चा बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यानंतर जागतिक आदिवासी दिनाचा भव्य कार्यक्रम नाशिकच्या गोल्फ क्लबवर मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देखील बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तसेच पंचवटीतून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी ते गोल्फ क्लब मैदान अशी शोभायात्रा असणार आहे. सकाळी 11 वाजता निमाणी येथून या मोर्चाला प्रारंभ होणार असून दुपारी 2 वाजता गोल्फ क्लब मैदान येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे.
आदिवासी दिनानिमित्त आज शोभायात्रा
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आज नाशिक शहरातून आदिवासी कलासंस्कृतीचे प्रदर्शन घडवणारी शोभायात्रा काढली जाणार आहे. यामध्ये राज्यभरातील आदिवासी कलावंतांची पथके सहभागी होणार असून पारंपरिक आदिवासी जीवनाचे नाशिककरांना घडवणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शोभायात्रा काढली जाणार आहे. निमाणी येथून निघालेला मोर्चा पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, गोदाघाट, रविवार कारंजा, शालिमारमार्गे सीबीएस, त्र्यंबकनाका येथून गोल्फ क्लब मैदानावर समारोप होणार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सभागृह नेता बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे.
बिरसा ब्रिगेडचा मोर्चा
बिरसा ब्रिगेड यांच्या वतीने मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी 11 वाजता गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. यावेळी अनेक समविचारी पक्ष आणि संघटना मोर्चात दर्शन सहभागी होतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. या मोर्चासाठी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम उपस्थित राहणार आहेत. गोल्फ क्लब मैदान येथून निघालेला मोर्चा त्र्यंबकरोडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचणार आहे.
हेही वाचा
World Tribal Day 2022 : निसर्गपूजक समाज म्हणून ओळख असलेल्या आदिवासींचा इतिहास जाणून घ्या