(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर नरहरी झिरवाळ यांनी मांडलेले दहा महत्वाचे मुद्दे? नेमके काय म्हणाले?
Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टात उद्या सत्तासंघर्षावर निकाल येणार असून नरहरी झिरवाळ यांनी सत्तासंघर्षावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याचबरोबर सत्ता स्थापनेच्या आधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची महत्वाची भूमिका राहिलेली होती. त्यांनी या सत्तासंघर्षांवर महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. सुप्रीम कोर्टात उद्या सत्ता संघर्षावर निकाल येणार असून नरहरी झिरवाळ यांनी सत्तासंघर्षावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics) बदलवणारा हा निकाल असणार आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष सुरु आहे. अशातच उद्या या सत्तासंघर्षांवर निकाल दिला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. झिरवाळ म्हणाले की, मी दिलेला निकाल हा कुठल्या आकसापोटी दिलेला नसून घटनेनुसार दिला आहे. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा विचार करून निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
झिरवाळ यांनी मांडलेले दहा महत्वाचे मुद्दे
-
जर निर्णय घ्यायची वेळ आली तर माझ्याकडे येईल, तत्कालीन उपाध्यक्ष असताना दिलेला निर्णय आहे, त्यामुळे माझ्याकडे निर्णय येईल.
-
16 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकारला धोका आहे, मुख्यमंत्री अपात्र ठरल्यावर सरकार पडणार, नंतर कोणाचे सरकार येणार हा भाग वेगळा आहे.
-
सत्तासंघर्षाबाबत अनेक दिवसांपासूनचा युक्तिवाद आहे, 16 आमदार मी अपात्र केलेले आहेत, त्यामुळे माझ्याकडे निर्णय आला, तरीही निर्णयात कुठलाही बदल होणार नाही.
-
ज्यावेळी निर्णय दिला, त्यावेळी मी उपाध्यक्ष होतो, त्यामुळे हा निर्णय माझ्याकडे येईल. मलाच पुढे निकाल द्यायचा आहे, तो अधिकार सध्याच्या विधानसभा अध्यक्षांना नाही.
-
निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतून घेऊ शकतात. सार्वभौम सभागृहात जर एखादा निर्णय होत नसेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे येत असतो. तो निर्णय मी दिलेला आहे, त्यामुळेच हा निर्णय मी देऊ शकतो.
-
तसेच हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकत, नसेल तर मी निर्णय घेऊ शकतो, आणि माझा निर्णय एकमताने मानला जाईल. त्यावेळचा निर्णय आम्ही घेतला होता, त्यामुळे आम्ही दोघे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे निर्णय घेतील.
-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्याकडे प्रकरण येईल असं म्हणत असले तरीही त्यात तथ्य नाही, त्यावेळी निर्णय ज्याने घेतला त्याकडे प्रकरण येईल.
-
मी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी हरकत घेतली, म्हणून प्रकरण न्यायालयात गेले. माझ्यावर अविश्वास आणला मात्र तो सिद्ध झाला नाही, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही.
-
तसेच उर्वरित 24 आमदारांना निर्णय लागू होऊ शकतो का? तर अद्याप त्याबाबत सांगता येणार नाही. मात्र आज तरी 16 आमदारांसाठी लागू होऊ शकतो.
-
पक्षाचे नेते म्हणून काय वाटत? सर्वसामान्य जनता होरपळलेली आहे, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आहे, सरकार म्हणून लक्ष नाहीय, शेतकरी, मजूर, उद्योजक यांना झळ भोगावी लागत आहे.