Nashik Subhash Desai : महाराष्ट्रातील कंपन्यांशी करार करायला दावोसला जाण्याची गरज काय? सुभाष देसाई यांचा सवाल
Nashik Subhash Desai : डाओसला जाऊन पुणे, जालनामधील कंपनीसोबत करार केले. हे करार मंत्रालयात बसूनही करता आले असते.
Nashik Subhash Desai : दावोसला (Davos) जाऊन महिंद्रा अँड महिंद्रासारख्या पुणे (Pune), जालनामधील (Jalna) कंपनीसोबत करार केले. हे करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय? मंत्रालयात बसूनही करता आले असते, मग डावोसला नेमकं केलं काय? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव न घेता केला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये (Nashik) महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी थेट देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत यावे लागत आहे. ऋतुजा लटके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली. इथपासून तर मुख्यमंत्री डावोसमध्ये जाऊन पुणे जालना जिल्ह्याच्या या महाराष्ट्रातील आणि काही भारतातील कंपन्यांशी करार करुन आले आहेत. हे करार करण्यासाठी स्वित्झर्लंडला जाण्याची काय गरज होती? मंत्रालयात बसूनही करार करता आले असते, अशी टीका सुभाष देसाई यांनी केली.
शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांच्या पाठिशी सुजाण मतदार कसे राहतील? : सुभाष देसाई
सुभाष देसाई (Subhash Desai) यावेळी म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी संकट काळात चांगले काम केलं असे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा पाहिजे, मात्र त्यांना गद्दारी करुन पायउतार केले. सुजाण मतदार शिवसेनेशी गद्दारी केली, त्याच्या पाठीशी कसे उभे राहतील? नोंदणी कोणीही केली तरीही मतदार सुजाण आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्ही काही केले नाही असे फडणवीस सांगत होते, तरी चार महिन्यांनी गिरीश महाजन यांनी खरे काय ते सांगितलेच. विधानपरिषदेत भाजपचे संख्याबळ कमी आहे, म्हणून त्यांना विधेयक मान्य करता येत नाही, म्हणून ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत. महाविकास आघाडी विधानपरिषदेत भक्कम आहे, ते भाजपच्या डोळ्यांत खुपत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी पाच ही जागी मदत केली. मी उद्योग मंत्री होतो, पदवीधर मुलांसाठी स्टार्टअप सुरु केले, स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले. पदवीधर यांना नोकरी मिळवून देण्यासाठी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी त्यांनी सरकारला केले.
डाओसला जाण्याची गरज काय?
महाविकास आघाडी विधान परिषदेत भक्कम आहे, ते खुपतंय, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी पाचही जागी मदत केली. मी उद्योग मंत्री होतो, पदवीधर मुलांसाठी स्टार्टअप सुरु केले, स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले. पदवीधर तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा. डाओसला जाऊन महिंद्रा अँड महिंद्रासारख्या पुणे, जालनामधील कंपनीसोबत करार केले. हे करार करण्यासाठी डाओसला जाण्याची गरज काय? मंत्रालयात बसूनही करता आले असते. आमचे उद्योग गुजरातमध्ये जातात आणि ते दावोसला जाऊन करार करतात. मात्र तरुणांना रोजगार देणारे उध्दव ठाकरे यांचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.