Nashik Sanjay Raut : येडे गबाळे पकडतात अन् पदाधिकारी दाखवून प्रवेश करतात, संजय राऊतांचा टोला
Nashik Sanjay Raut : कोणीही उचलून आणतात, अन् शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून प्रवेश करून घेत असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
Nashik Sanjay Raut : नाशिकचे (Nashik) कोण पदाधिकारी आहेत, मला माहित नाही तसेच नाशिकमधल्या लोकांना देखील पदाधिकारी माहित नाही, येडे गबाळे असे कोणीही पकडतात आणि पदाधिकारी दाखवून त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना (Shivsena) जशीच्या तशी आहे, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार असून तत्पूर्वी नाशिकमधून असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकमधून ठाकरे गटातून अनेक पदाधिकारी बाहेर पडले असून शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रश्नांवर राऊत यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहत 'अच्छा, काय म्हणता आहेत? असे प्रश्नार्थक उत्तर दिले. त्याचबरोबर ' तुम्हाला नाव माहिती आहेत का? शिंदे गटात प्रवेश केलेली चार नावे सांगा? नाशिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही कोण लोक गेली त्यांची नाव माहित नाहीत, कोणीही उचलून आणतात, अन् शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून प्रवेश करून घेत असल्याचे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संजय राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, अच्छा काय म्हणता आहेत, नाव माहिती आहेत, चार नाव सांगू शकतात, पदाधिकारी गेले आहेत, तर तुम्हाला नाव माहित आहेत का? नाशिककरांना नाव माहित नाहीत, येडे गबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून प्रवेश करतात. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे. दोन चार दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, मात्र शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख, आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक जागेवरच आहेत. तसेच मलाही नाव माहित नाहीत, कोणीतरी म्हणे गेले. नाशिकचे कोण पदाधिकारी आहेत, मला माहित नाही तर नाशिकमधल्या लोकांना देखील पदाधिकारी माहित नाही. अहो इकडून तिकडून येडे गबाळे असे कोणीही पकडतात आणि पदाधिकारी दाखवून त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेत आहे. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे. शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक, प्रमुख पदाधिकारी जागेवरच असून हे कोण पदाधिकारी प्रवाह करत आहेत, त्यांची नाव मला द्या, मी सांगतो, पदाधिकारी आहेत कि काय? मुळात कोणालाही उचलून पक्ष प्रवेश केला जात आहे. त्याला पदाधिकाऱ्यांचे नाव दिले जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना आहे तशीच आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे राऊत म्हणाले.
पन्नास पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
नाशिक हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आजच्या घडीला असंख्य कार्यकर्त्यानी शिंदे गटात प्रवेश केल्याने अवस्था बिकट झाली आहे. हेच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वीच पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळेच शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे पन्नास पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत प्रवेश झाला आहे.