मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे

पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे

मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 48 तासांत

मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

सोमवारी पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे.

यामुळे अखेर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे

विकेंडच्या दिवशी पाऊस झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला.

विविध जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाही सुखावला आहे.