(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik LPG Gas : 'होळी रे होळी, आता पुन्हा चुलीवर भाजा पोळी', नाशिकमध्ये गॅस दरवाढीविरोधात आंदोलन
Nashik LPG Gas : नाशिकमध्ये गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवत अनोखे आंदोलन करण्यात आले.
Nashik LPG Gas : सर्वसामान्यांच्या घराघरात असणाऱ्या गॅस सिलेंडरने (Gas Cylinder) पुन्हा गृहिणीची डोकेदुखी वाढवली आहे. पेट्रोलियम गॅस (LPG) सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाल्यानंतर सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन (Protest) करण्यात आले.
देशातील सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा महागाईचा दुहेरी फटका बसला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या घरगुती आणि व्यावसायिक किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. होळीपूर्वीच जनतेला महागाईच्या तडाख्याला सामोरे जावे लागले असून यावरून नागरिक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यासोबतच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) महिला आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) चूल पेटवत अनोखे आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी फूटपाथवर चूल पेटवत अनोखे आंदोलन महिला कार्यकर्त्यांनी केले. 'होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी' अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली.
केंद्र सरकारने घरगुती गॅस तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. आज नाशिक शहरात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी कडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फुटपाथवर महिला पदाधिकाऱ्यांकडून चूल मांडून चहा देखील बनविण्यात आला दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचे फलक दाखवून निषेध नोंदवला. एकीकडे जनता अगोदरच महागाईने त्रस्त असून त्यातच आता सरकारने गॅस दरवाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.
गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ
दरम्यान वर्षात पहिल्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा 50 रुपयांची वाढ झाली. 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) आता 1 हजार 103 रुपयांपर्यंत पोहचली आहे. गेल्या चार वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 56 टक्के दरवाढ झाली आहे. यापूर्वीच्या किंमतींवर नजर टाकली असता, सध्या हजार रुपयांत सध्या एक गॅस सिलेंडर मिळत आहे. पूर्वी एवढ्याच किंमतीत दोन गॅस सिलेंडर येत होते. तसेच एलपीजीवरील एकूण सबसिडी गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.महागाईच्या याच भडक्या विरोधात नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.