Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर, तीन महिन्यात तिसरा दौरा
Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले असून दोन महिन्यात पवारांची तिसरी नाशिक भेट आहे.

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले असून तीन महिन्यात पवारांची तिसरी नाशिक भेट आहे. आज नाशिक शहरात तर उद्या (8 एप्रिल) जिल्ह्यातील काही भागात ते दौरा करणार आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे देखील नाशिक दौऱ्यावर असून शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त ते येणार आहेत.
शरद पवार हे आज नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले असून दोन दिवस ते नाशिकसह जिल्हाभरात दौरा करणार आहेत आज ते हिंद मजदूर सभेच्या (Hindu Majdur Sabha) कार्यक्रमाला हजेरी लावणार असून त्यानंतर रविवारी (9 एप्रिल) आदिवासी विकास विभागाच्या देवरगाव (Devargaon) येथील शासकीय आश्रम शाळेतील वसतिगृहाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे दोन पक्षातील नेत्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोरोना, ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) प्रभाग रचनेवरुन गेल्या वर्षभरापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. गेल्या महिन्यात जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी नाशिक जिल्ह्यात दौरा केला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील विधानसभा तर शरद पवार यांनीही जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांचा दौरा
शरद पवार यांनी यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती. त्याचवेळी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर 10 मार्च रोजी त्यांनी कळवण येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फुटी पुतळ्याचे लोकार्पण केले होते. नाशिक शहरातही त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. आता पुन्हा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नाशिक मधील दोन कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पवारांकडून नाशिक लोकसभा मतदारसंघात मतपेरणी सुरु आहे का? अशी चर्चा शहरासह जिल्ह्यात रंगली आहे
हिंद मजदूर सभा अमृत महोत्सव
इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस मजदूर संघाची मातृसंस्था असलेल्या हिंद मजदूर सभा या राष्ट्रीय कामगार संघटनेला 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण नाशिकरोड परिसरात ध्वज लावण्यात आले आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता सिक्युरिटी प्रेसच्या युएस जिमखाना ग्राऊंडवर शरद पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
