(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Air Service : मोठी बातमी! नाशिक विमानतळ दुरुस्तीसाठी 20 नोव्हेंबरपासून बंद, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था काय?
Nashik Air Service : ओझर (Ojhar) येथील विमानतळ वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Nashik Air Service : नाशिकच्या (Nashik) विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून ओझर (Ozar Airport) विमानतळ येत्या 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या 13 दिवसांच्या कालावधीत देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात येथून विमानांचे उडान होऊ शकणार नसल्याची माहिती ओझर विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहराची उड्डाण (Air Service) सेवा काहीशी बारगळली आहे. उडान योजनेअंतर्गत सुरू झालेल्या विमान सेवा बंद पडत असताना आता ओझर येथील विमानतळ वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे सर्व विमानसेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. सध्या नागरिक प्रवासी वाहतुकीसाठी स्पाइस जेट या विमान कंपनीची दिल्ली-हैदराबाद विमानसेवा सुरू आहे. तीही आता सुमारे 20 नोव्हेंबर ते तीन डिसेंबर पर्यंत बंद ठेवावी लागणार आहे. दरम्यान एचएएलकडून दरवर्षी विमानतळाच्या दुरुस्ती कामकाजासाठी विमानतळ बंद ठेवण्यात येते. यंदा 20 नोव्हेंबरपासून ते बंद ठेवण्यात येणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) विमानतळ हे लष्करी सेवेसाठी असले तरी आता ते नगरी हवाईसाठी खुले करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या काळात सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक आर सी रोडवे यांनी सांगितले. सध्या एचएएलच्या ओझर विमानतळावरून स्पाइड जेटची विमान सेवा सुरू असून दिल्ली आणि हैदराबाद येथे जोडणारी ही सेवा आता 13दिवसांच्या कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पर्यंत बंद ठेवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र स्पाइड जेट करून अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली नसल्याचे समोर आले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार येथे हा 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत विमानतळाच्या धावपट्टीच्या रिसर्फेसिंग चे काम केले जाणार आहे. ही नियमित प्रक्रिया असून त्यात हवाई वाहतूक संचालनालयाच्या निर्देशानुसार धावपट्टीची देखभाल दुरुस्ती व अन्य कामे केली जातात. परिणामी या धावपट्टीवरून विमाने येजा करू शकणार नाहीत. ओझर विमानतळ येथून अलायन्स व स्टार एयर या कंपन्यांनी सेवा बंद केली असून सध्या केवळ सेवा सुरू आहे. दिल्ली व हैद्राबाद अशा दोन शहरांसाठी असलेली सेवा तेरा दिवस बंद राहणार असल्याने उद्योजक व पर्यटकांची गैरसोय होणार आहे.
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था काय?
दरम्यान पर्यटनाच्या हंगामात हे काम केले जाणार असल्याने अनेकांना पर्यटनाचे बेत रद्द करावे लागणार आहेत, हे काम हिवाळ्यातच करावे लागते, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या कामामुळे तब्बल तेरा दिवस विमानतळ बंद राहणार असून आहे. ओझर विमानतळावरून सध्या स्पाइड जेटच्या वतीने दिल्ली व हैदराबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. या 13 दिवसांच्या काळात ही विमाने बंद राहतील व ती शिर्डी येथे वळवली जातील. तसे झाल्यास नाशिककरांना शिर्डीतून विमान पकडावे लागणार असल्याचे समजते.