Nashik Smart City : नाशिक स्मार्ट सिटी : मनपा आयुक्तांचा स्पेन दौरा ठरतोय चर्चेचा विषय, नेमकं प्रकरण काय?
Nashik Smart City : नाशिकचे (Nashik) मनपा आयुक्त स्मार्ट सिटी संदर्भातील जागतिक परिषदेसाठी स्पेनला (Spain) रवाना झाले आहेत.
Nashik Smart City : एकीकडे नाशिक (Nashik) स्मार्ट सिटी अंतर्गत आलेल्या कामांबाबत आजही नाशिकरांमध्येही उदासीनता असून उर्वरित कामे न करता स्मार्ट सिटीने (Nashik Smart City) गाशा गुंडाळावा अशी मागणी होत आहे आहे. असे असताना मात्र नाशिकचे मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC) हे स्मार्ट सिटी संदर्भातील जागतिक परिषदेसाठी स्पेनला (Spain) रवाना झाले आहेत. त्यामुळे आपल्याच शहरात स्मार्ट सिटीचे वाभाडे उडाले असतांना दुसऱ्या देशात आयुक्त काय सल्ला देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मेक इन इंडिया (Make In India) या सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2016 मध्ये नाशिक शहराची निवड करण्यात आली होती. मंदिरांचा शहर अशी ओळख असलेल्या शहराच्या विकासासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांतून अधिकचे विकास काम होणे अपेक्षित होतं. मात्र शहरात कासव गतीने ही विकास काम केली जात आहेत. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण आहे. मात्र नाशिककरांच्या नशिबी सरकारी काम आणि पाच वर्षे थांब या म्हणीचा प्रत्यय आला आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केली जाणारी विकास काम अद्यापही पूर्ण झाली नाही येते. खरंतर सुरुवातीपासूनच स्मार्ट सिटी अभियान वादात सापडलं होतं.
अशातच आता नव्याने नियुक्त झालेले व आपल्या धडाकेबाज कामांनी सर्व परिचित असणारे मनपा आयुक्त आता याच स्मार्ट सिटीच्या परिषदेसाठी स्पेनला गेले आहेत. आजपासून दोन दिवस स्पेन देशातील बार्शी लोना शहरात ही परिषद होणार आहे. या परिषदेत 'स्मार्ट सिटी कशा असाव्यात' याबाबत जगातील विविध स्मार्ट सिटी चे प्रतिनिधी म्हणून करणार आहेत. स्मार्ट सिटी एक्सपोही या निमित्ताने होणार आहेत. महाराष्ट्रातून नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे सहभागी झाले आहेत. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याबरोबर स्थानिक कल्याण, डोंबिवली, नागपूर या स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत.
स्मार्ट सिटीचा गाजावाजा
स्मार्ट सिटी योजनेच्या सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण आता जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला असून 1052 कोटींची कामे असताना एप्रिल 2022 पर्यंत 46 कोटींची कामे झाली. तर 1000 कोटींची कामे दृष्टीपथात नाहीत. स्मार्ट सिटी प्रकल्पात गोदापार्क, सीसीटीव्ही बसवणे, सुशोभीकरणाची कामे करण्यात येत आहेत. मात्र अद्यापही अनेक कामांबाबत सांशकता आहे. नेमकी कामे कोणती करायची, किंवा राहिलेली कामे कधी होतील असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो आहे. अनेक भागात खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये जा करण्यास मोठा अडथळ्यांची शर्यत पार कारवाई लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जूनपर्यंत गाशा गुंडाळणार
देशातील शंभर शहरांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना सुरू केली होती. झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिकची त्यामध्ये निवड झाल्यामुळे शहराचा झपाट्याला विकास होईल अशी नाशिककरांना अपेक्षा होती. मात्र शहरात या योजनेअंतर्गत जुजबी काम झाली असून 1000 कोटींच्या कामांचा ठाव ठिकणा नाही. एकंदरीतच गेल्या पाच वर्षातील स्मार्ट सिटी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे शहराचा विकास होण्याऐवजी ते बकाल झाल्याचं पहायला मिळते आहे. गेल्या पाच वर्षांपासून ही काम केली जात आहे. एप्रिल 2022 नंतर स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामाचे निविदा न काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जून 2023 मध्येच हे अभियान गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.