(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rohit Pawar : मुख्यमंत्री झालात तर बदल काय करणार? रोहित पवारांना विद्यार्थ्याचा थेट सवाल, म्हणाले..
Nashik Rohit Pawar : मुख्यमंत्री झालात तर काय कराल? या विद्यार्थांच्या प्रश्नाला आमदार रोहित पवार यांनी थेट उत्तर दिले आहे.
Nashik Rohit Pawar : मी एक पॅशनेट व्यक्ती आहे. खेळायला लागलो तर मनापासून खेळतो. मला क्रिकेट खूप आवडतं, कॅप्टन बनवा किंवा व्हाईस कॅप्टन बनवा, पण टीम जिंकली पाहिजे, यासाठी खेळेन. त्यामुळे महाराष्ट्रात युवांना कशी संधी देता येईल, युवांच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा पुढे आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहिल, अशी उत्तर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिले.
आज नाशिकच्या (Nashik) केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने 'तुम्ही मुख्यमंत्री (Maharashtra CM) झाल्यावर महाराष्ट्रात पहिला बदल काय करणार? असा प्रश्न रोहित पवारांना विचारला यावर त्यांनी खणखणीत उत्तर दिले. यावर रोहित म्हणाले की, मी एक पॅशनेट व्यक्ती असून खेळायला लागलो तर मनापासून खेळतो. मला क्रिकेट खेळायला आवडते. अशावेळी मला कॅप्टन बनवा किंवा व्हाईस कॅप्टन बनवा, किंवा ओपनिंगला उतरावा किंवा शेवटी उतरावा पण टीम कशी जिंकेल, या प्रयत्नात मी असतो, अशा शब्दांत विद्यार्थांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्र व्हिजन फोरम (Maharashtra vision Forum) या युवाकेंद्रित उपक्रमानिमित्त रोहित पवार यांचा नाशिक येथील युवांसोबत संवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणले की, बिजनेस म्हणा किंवा राजकारण करतो ते मनापासून करतो. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही. महाराष्ट्रामध्ये विकासाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक युवाला विविध क्षेत्रात संधी देण्यासाठी योग्य धोरण कसं आखता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू. आपल्या सर्वांचा वापर जसा केला जातो, तसं न होऊ देता आपल्या सर्वांची एका सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य दिशेने कशी नेता येईल यासाठी उपाययोजना करता येईल. 2014 आणि 19 मध्ये तरुण आमदारांची संख्या घटली आहे. लोकसभेमध्ये सुद्धा घटली. आज खूप प्रश्न आहेत.. अनेक पॉलिसी आपल्याला राबवायचा आहेत, बदल घडवणे तुमच्या हातात आहे, ते तुम्ही लोकशाही मार्गाने मतदानाच्या माध्यमातून करा, असे आवाहन यावेळी उपस्थित युवा वर्गाला पवार यांनी केले.
काय आहे महाराष्ट्र व्हिजन फोरम उपक्रम... ?
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून देशभरातील युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. युवकांना एकत्र आणण्यासाठी एक चळवळ या माध्यमातून उभी केली जाईल. राज्यातील सुमारे साठ टक्के लोकसंख्या चाळीस वर्षांखालील असली तरी सार्वजनिक धोरण यंत्रणेत युवकांचा सहभाग अत्यल्प आहे. चाळीस वर्षांखाली खासदार आणि आमदारांचे प्रतिनिधित्व हा विषय आहे. तरुणांसाठी असे कोणतेही व्यासपीठ नाही, जिथे शासन आणि धोरण निर्मिती प्रक्रियेत युवा वर्ग उपयुक्त योगदान देऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना करण्यात आली आहे. युवकांनी प्राधान्यक्रमाने केलेल्या सूचना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविल्या जातील आणि शाश्वत विकास योग्य कार्यक्रम पत्रिका तयार केली जाईल, असे पवार यांनी सांगितले.