एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : विरोधक बांधावर जाताय, गेलं पाहिजे, सगळ्यांना कामाला लावलंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

CM Eknath Shinde : सध्या अनेकजण शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा, समजून घेतल्या पाहिजे.

CM Eknath Shinde : सध्या अनेकजण शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा, समजून घेतल्या पाहिजे. सरकार आणि विरोधकांनी मिळून काम केले पाहिजे. विरोधक बांधावर जात आहेत, चांगली गोष्ट आहे, आपणच सगळ्यांना कामाला लावलेल आहे, अशी खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला आहे. तर नंदुरबारच्या (Nandurbar) नगर परिषदेचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने सभागृहात एकच जल्लोष झाला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद (Nagar Parishad) नूतन इमारत उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले, समृद्धी महामार्गासारखे अनेक मोठे प्रकल्प देखील सुरू झाले, राज्यामध्ये काही ठिकाणी गती मंदावली, किंबहुना पूर्णपणे थांबली होती, मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापन केल्यानंतर तातडीने चालना देण्याचे काम सुरू करण्यात आले. जसं केंद्राने काही पेट्रोल डिझेलमध्ये पैसे कमी केले तसेच राज्याने देखील केले पाहिजे, परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये ते केले नव्हते, परंतु आपल्या सरकार आल्या आल्या पेट्रोलमध्ये पाच रुपये, डिझेल मध्ये तीन रुपये कमी करून टाकले. लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचं काम आपण केलं. आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून दोन हेक्टरला मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर सरकारने 6 हजार कोटी रुपये निधी वाटण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांना पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा घेतला.

ते पुढे म्हणाले, तसेच 75 वर्षे वयाच्या नागरिकांना देखील एसटीमध्ये मोफत प्रवास करण्यास सुरवात केली. गेल्या 52 महिन्यांमध्ये एक कोटी पेक्षा जास्त लोकांनी जास्त आणि त्याचा फायदा घेतला लाभ घेतला. त्याचबरोबर या दुष्काळग्रस्त भागांमध्ये जे वाया जाणार पाणी आहे, ते पाणी वळविण्याचा देखील निर्णय पहिल्याच कॅबिनेटमध्ये घेतला. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली आली पाहिजे, लाखो हेक्टर जमीन सिंचन खाली आणण्यासाठी पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा जो काही लाखो एकच शेती सेंद्रिय देखील झाली पाहिजे, यासाठी देखील आपला पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर दिवाळी गोड झाली पाहिजे, म्हणून राज्यांमध्ये पहिल्यांदा रवा, साखर, चणाडाळ, तेल केवळ शंभर रुपयांमध्ये देण्याचा देखील निर्णय आपण घेतला.हे सर्व सामान्य लोकांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले असून म्हणून आपण काम करणारा आपल्या सरकार आहे. 

प्रत्येक विभागामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीचं काम करण्याचा प्रयत्न आपल्या सरकार करत आहे. आणि म्हणूनच तीन महिन्यांमध्ये ७२ मोठे निर्णय, 400 जीआर काढले. गुलाबराव पाटील यांनी जवळपास बावीस हजार पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आले आहेत. तसेच आदिवासी समाजाला न्याय देण्याचे काम करायचे आहे, कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहचायचे आहे. नंदुरबार शहर वेगाने विकसित होत आहे, मात्र अजूनही अनेक विकासाच्या गोष्टी करायच्या असून आज तातडीने जे जे काही लागेल, नगरविकासाच्या माध्यमातून करण्यात येतील. त्यासाठी राज्य सरकार हात आखडता घेणार आहे. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरभरून मदत 
एकाच दिवशी जवळपास सहा लाख 90 हजार लोकांच्या खात्यामध्ये एकाच क्लिकवर अडीच हजार कोटी रुपये पाठविण्यात आले. बाकी लोकांचे वाटप सुरु असून राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. पहिल्या पावसानंतर अतिवृष्टीमध्ये त्यांना देखील आपण तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर जे सततच्या पावसामुळे निकषांमध्ये बसत नव्हते, त्यांचेही पंचनामे करण्याचे सूचना दिल्या असून त्यांनाही मदत देण्याचे ठरविले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांचे देखील पंचनामे करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असून काल-परवापर्यंत जे जे काही नुकसान झालंय ते शेतकऱ्यांना मदत दिले पाहिजे, ही भूमिका आपण घेतली. त्याचबरोबर जून जुलै मध्ये झालेल्या नुकसान, तसेच ऑगस्टमध्ये झालेले नुकसान सप्टेंबरमध्ये तात्काळ देण्याचा सुरू झालं आहे. शेतकऱ्यांना देखील प्रति युनिट एक रुपया कमी करण्याचा देखील निर्णय घेतला त्याच बरोबर स्थिर आकारांमध्ये पंधरा रुपये प्रति महिना सवलत देण्याचा देखील आपण निर्णय घेतला. त्याचबरोबर झालेल्या नुकसान जे निकषांमध्ये बसत नाही, त्या शेतकऱ्यांना देखील 90 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 

03 मिनिटांत सात कोटी मंजूर 
यावेळी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरु होतं.  चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केला असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने उपस्थितांनी टाळ्या वाजवीत, घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा  निधी फोन करून मंजूर केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
Embed widget