एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील पहिल्या 'मिलिटरी गर्ल'चे निधन, 'त्या' अपघातानं सर्व काही हिरावलं!

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यावर शोककळा पसरली असून जिल्ह्यातून पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात (SSB) रुजू झालेल्या महिला जवानाचे निधन झाल्याची घटना घडली आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यावर शोककळा पसरली असून जिल्ह्यातून पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात (SSB) रुजू झालेल्या महिला जवानाचे निधन झाल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील (Niphad) देवगाव येथील गायत्री विठ्ठल जाधव या सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होत्या. ट्रेनिंगच्या दरम्यान खड्ड्यात पडून अपघात झाला होता. 

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातून सीमा सुरक्षा दलात भरती होणारी पहिली महिला जवान गायत्री जाधव (Gayatri Jadhav) होती. अत्यंत हलाखीची परिस्थितीत गायत्रीने रोजंदारी करत देवगाव येथील डी आर भोसले महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर लासलगाव नूतन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लासलगाव येथीलच एका खाजगी अकॅडमी ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 2021 मधील स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत ती पास झाली. त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे ट्रेनिंगसाठी तिची निवडही झाली. राजस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना खड्ड्यात पडून तिचा अपघात झाला. यावेळी तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

दरम्यान शस्त्रक्रियेनंतर गायत्री पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने जयपूर येथील एसएम हॉस्पिटलमध्ये पुन्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती पुन्हा ट्रेनिंगला रुजू झाली. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर बिहार राज्यातील अरिहार जिल्ह्यातील एसएसबी बथनाहा येथील नेपाळ सीमेवर नियुक्ती झाली. मात्र काहीही दिवसानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन घरी आली. त्यानंतर नाशिक येथील दोन खाजगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर जून महिन्यात मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या हॉस्पिटलमध्ये तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे संदर्भ देण्यात आला. मात्र तिथे जाण्यापूर्वी तिची तब्येत खालावली. व त्यातच तिचा मृत्यू झाला. 

नाशिक जिल्ह्यातून पहिली महिला
नाशिक जिल्ह्यातून सैन्यात जाणाऱ्या पहिल्या दोन मुलींमध्ये व निफाड तालुक्यात सैन्यात जाणारी पहिली महिला होती. गायत्रीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना तिने यश संपादन केले. मात्र ट्रेनिंगच्या दरम्यान झालेल्या अपघातामुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एकीकडे ट्रेनिंग सुरु असताना अपघात झाला. अपघातानंतर शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती रुजू झाली. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. यात कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागला. अखेर गेल्या अनेक महिन्यांपासून झुंज देत असलेल्या गायत्रीने प्राण सोडला. तिच्या निधनाने कुटुंबियांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडीABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Embed widget