Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडून शिंदेंची वारंवार फसवणूक, त्यामुळे... : नारायण राणे
Sanjay Raut : संजय राऊत यांनी शिवसेना संपवली आहे, असा आरोप नारायण राणेंनी संजय राऊतांवर केला आहे.
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले आहे त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदेंना वारंवार अपमानाची वागणूक, वेगवेगळी दिलेली आश्वासन आणि नंतर फसवणूक केली यातून शिंदेंचा स्वाभिमान जागा झाला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतला. शिंदेंनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : राणे
नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना वारंवार मुख्यमंत्रीपद देतो असं सांगून त्यांना खर्च करायला लावला, पण कधीही मुख्यमंत्री केलं नाही. मुख्यमंत्रीपदाची वेळ आली त्यावेळी आपण स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यातील स्वाभिमान जागा झाला.मुख्यमंत्री असूनही पक्ष प्रमुख असताना अडीच वर्षे पक्ष सांभाळता आला नाही. शिवसैनिंकाशी भेटी नाही फक्त मातोश्रीवरून आदेश द्यायचे.त्यामुळे ही वेळ आली आहे. मुख्यमंत्री यांनी एकही क्षण मुख्यमंत्री पदावर राहयला नको राजीनामा दिला पाहिजे तो दिला नाही. 56 मधील 35 आमदार गेले तरी त्यांनी राजीनामा दिला नाही. एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला अन्यथा जे काही झालं आनंद दिघे यांच्या बाबतीत ते तुमच्या बाबतीत घडलं असते. आनंद दिघेंना मातोश्री बंद होते.
शिवसेनेला कोणी घाबरत नाही
संजय राऊत यांचा आवाज बसला आहे. शिवसेनेला कोणी घाबरत नाही. वर्षावर 11 आमदार आहेत. त्यांना 56 लोकांचा गटनेता नको यांनी वर्षावर थांबायला नको असे पक्ष प्रमुख असतात का? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. शिवसेनेच्या जडणघडणीपासून जे तुमच्यासमोर आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली आहे, असा आरोप नारायण राणेंनी संजय राऊतांवर केला आहे.
संबंधित बातम्या
Eknath shinde : भाजपसोबत सत्ता स्थापन करा, महाविकास आघाडीची साथ सोडा... एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर अटी
Nashik Shivsena : 'उद्धव साहेब, तमाम शिवसैनिक तुमच्या सोबत', नाशिकमध्ये शिवसैनिकाकडून 'बॅनरबाजी'