मुंबईत होणार्या भाजप विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीची तारीख ठरली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Jul 2023 07:51 AM
मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात
Mumbai Rain : मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात
पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी गोरेगाव,मालाड,कांदिवली बोरिवली,दहिसर,विलेपार्ले शांताक्रुझ या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे....
Nagpur News : नागपूर- GST अधीक्षकाला 5 हजाराची लाच घेतांना अटक
Nagpur News: केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकाला 5 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. या कारवाईने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. निमित उर्फ अमित कुमार असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयने अजितेम सहस्त्रबुद्धे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली. अजितेम सॉफ्टवेअर कंपनी चालवितात. त्यांनी जीएसटी क्रमांकाच्या नोंदणीसाठी विभागाकडे अर्ज केला होता. जीएसटी क्रमांकाच्या पडताळणीसाठी निमित कुमारने पाच हजार रुपयांची मागणी केली त्या दरम्यान सीबीआयने हि कारवाई केली.
Mumbai Rain Record: जोरदार...दमदार....जुलै महिन्यातील मुंबईतील पावसाचे विक्रम मोडीत
Mumbai Rain Record: यंदा मुंबईत जुलै महिन्यात झालेल्या पावसाने विक्रम रचला आहे.आतापर्यंत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Read More
Bhandara Rain: आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मेघगर्जनेसह दमदार पावसाची हजेरी....उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
Bhandara Rain: भंडारा: आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज रात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार हजेरी लावली. मागील आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. परिणामी नागरिक या उकाळ्यामुळं हैराण झाले होते. सकाळपासून प्रखर उष्णतेचे चटके बसत असताना रात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, पावसाअभावी भात पिकाची लागवड खोळंबल्यानं चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Rain Update : पावसाचा रेड अलर्ट...मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Maharashtra School close : हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर मुंबई, रत्नागिरी आणि चंद्रपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.
Read More
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती नाही, ही तर...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात थेट सांगितले
Mumbai Police Recruitment: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कंत्राटी पोलीस भरतीवर भूमिका स्पष्ट केली. राज्य सुरक्षा मंडळाकडून तात्पुरत्या स्वरुपात 3000 जागा भरण्यात येणार असून पोलीस दलात कंत्राटी नेमणूक होणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
Read More
Mumbai Nashik Highway Traffic: नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवरून विधानसभेत आज पुन्हा गदारोळ
Traffic Updates: विधानसभेत नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीचा मुद्दा दुसऱ्या दिवशीही गाजला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे या मुद्यावर आक्रमक झाले.
Read More
Accident Compensation : रस्ते अपघातातील बळीच्या कुटुंबीयांना 1.49 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या, विमा कंपनीला न्यायालयाचा दणका
Maharashtra News : ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने रस्ता अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीची पत्नी आणि मुलांना 1.49 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत
Read More
Amravati News : शेतकऱ्यांसाठीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी, अमरावती जिल्ह्यात 734 पीएम समृद्धी केंद्र सुरू होणार
Amravati News : महाराष्ट्रात 14 हजार 430 केंद्रांचा समावेश असून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात 670 केंद्र आणि शहरात 64 ठिकाणी पीएम किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
Read More
Nashik News : दबक्या पावलांनी आला, मात्र दोन कुत्र्यांनी बिबट्याला सळो की पळो केलं, नाशिकचा व्हिडीओ व्हायरल
Nashik News : नाशिक (Nashik) शहरात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत.
Read More
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदी किती फुटावर पोहोचल्यानंतर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोणता भाग पाण्याखाली जातो? फुट बाय फुट समजून घ्या!
कोल्हापूर जिल्ह्याने 2019 आणि 2021असे दोन प्रचंड असा महापूर अनुभवल्याने पंचगंगेची पाणी पातळी वाढू लागल्यानंतर शहरातील कोणता भाग पाण्यात जातो, याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.
Read More
Nashik News : रात्रीस खेळ चाले! शेतकऱ्यांना खतांची टंचाई, तर दुसरीकडे रात्रीतून खतांचा काळाबाजार
Nashik News : गेल्या काही दिवसांत राज्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यात खते, बी बियाणांचा काळाबाजार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
Read More
Kolhapur Rain Update: पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर, पण राधानगरी धरणातून विसर्ग वाढल्याने धोका पातळी गाठण्याची शक्यता
घराच्या दारापर्यंत पाणी येण्याची वाट पाहू नये. कारण त्यानंतर स्थलांतर करणे अवघड होऊन जाते. निवारागृहात महिला आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
Read More
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो, 1100 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
ठाकरे गटाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने 10 टक्के सुरू असलेली पाणी कपात रद्द करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
Read More
Pandharpur News: कलाकेंद्रात 18 वर्षांपेक्षा लहान मुली नकोत, डीजेवरही बंदी; राज्यस्तरीय तमाशा आणि कलाकेंद्र बैठकीत निर्णय, कलावंतांकडून निर्णयाला आक्षेप
अठरा वर्षाच्या खालील मुलींना तमाशा केंद्रात कलावंत म्हणून आपली कला सादर करता येणार नाही आणि तमाशा, संगीत पार्ट्यांमध्ये डीजेला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
Read More
Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; नदीपात्रात 7112 क्यूसेकनं विसर्ग सुरू, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
राधानगरी धरणाचे एकूण चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुराचा धोका वाढला आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 आणि 6 अशी एकूण 4 दरवाजे आज (26 जुलै) सकाळपासून उघडली आहेत.
Read More
Nashik News : मरणसुद्धा परवडत नाही! गर्भवती महिलेला डोली करून दवाखान्यात नेलं, वाटेतच मृत्यू, मृतदेह डोली करूनच आणला!
Nashik News : गरोदर महिलेला रस्ता नसल्याने डोली करून दवाखाण्यात नेत असताना मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.
Read More
राज्यातील शेतकऱ्यांपुढे 'बोगस बियाणां'चं नवं संकट; आतापर्यंत 1 हजार 85 तक्रारी दाखल
Bogus Seed : एकूण तक्रारीपैकी 927 पंचनामे झाले आहेत. यात बहुतांश तक्रारी कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या आहेत.
Read More
Sangli News: 'दुष्काळी भागाला पाणी द्यायचं नसेल तर आम्ही कर्नाटकात जाऊ', जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांचा सरकारकडे मागणी
Sangli News: सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही.
Read More
Palghar News: भोग काही सरेनात, नदीवर पूल कोणी बांधेना; मोखाडा तालुक्यातील नागरिकांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.
Read More
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.