एक्स्प्लोर

Nashik News : मरणसुद्धा परवडत नाही! गर्भवती महिलेला डोली करून दवाखान्यात नेलं, वाटेतच मृत्यू, मृतदेह डोली करूनच आणला! 

Nashik News : गरोदर महिलेला रस्ता नसल्याने डोली करून दवाखाण्यात नेत असताना मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. 

Nashik News : एकीकडे शासन आपल्या दारी सारख्या इव्हेंटमधून दारोदारी सरकारी योजना पोहचवण्याचा दावा करत असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यांमध्ये (Trible Villages) मात्र आजही रस्त्याअभावी आदिवासी बांधवाना जीव गमवावा लागत आहे. पेठ, धुळे, पालघरच्या दुर्दैवी घटनेनंतर आता इगतपुरी तालुक्यात संतापजनक घटना समोर आली आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील जुणवणेवाडी येथील गरोदर महिलेला रस्ता नसल्याने डोली करून दवाखाण्यात नेत असताना मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. 

'शासन आपल्या दारी, रस्त्यांसाठी खर्च, गाव तेथे काँक्रीट रस्ते अशा वल्गना करणाऱ्या प्रशासनाचे दावे फोल ठरत असल्याचे उघड झाले आहे. प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर झोळी करून तिचा मृतदेह तीन किलोमीटरचा प्रवास करत घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात घडली. जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत या महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी पहाटे अडीच वाजता अडीच किमी पायी चालत महिलेला तळोघ येथून घोटीला आणले. तिची प्रकृती खालावल्याने तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) नेण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेत महिलेच्या पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाला.

रस्त्याची दुरावस्था, पायपीट, सरकारी अनास्था यात झालेल्या विलंबामुळे महिलेला प्राण सोडावा लागल्याचा आरोप होत आहे. घरी नेण्यासाठी देखील सुविधांअभावी मृतदेह झोळीतून घरी नेण्यात आला. या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या समस्यांचा प्रश्न उपस्थित केला. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने घडलेली घटना असल्याची प्रतिक्रिया लाजिरवाणी एल्गार संघटनेचे भगवान मधे यांनी व्यक्त केली.

मरणसुद्धा परवडत नाही... 

जुनवणेवाडीसारख्या अनेक गावात रस्ताच नाही. रस्ता एवढा खराब आहे की, पावसाळ्यात चालणेही मुश्कील होते. तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे तीन किलोमीटरच्या अतिशय कच्च्या सत्याने यावे लागते. पावसामुळे रस्ता सध्या चिखलमय झाला आहे. अशावेळी कुणाचे मरणसुद्धा या लोकांना परवडत नाही. करोड़ों रुपयाच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने ही लाजिरवाणी घटना असून या गावात तातडीने रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एकीकडे आदिवासी बांधवासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना असताना केवळ रस्त्यांअभावी त्यांना जीव गमवावा लागत असल्याची लाजिरवाणी असून, या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhule Shirpur : अन् या झोळीत देशाचं भविष्य! धुळ्यात गर्भवती महिलेला झोळीत घालून सहा किलोमीटरची पायपीट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget