(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati News : शेतकऱ्यांसाठीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी, अमरावती जिल्ह्यात 734 पीएम समृद्धी केंद्र सुरू होणार
Amravati News : महाराष्ट्रात 14 हजार 430 केंद्रांचा समावेश असून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात 670 केंद्र आणि शहरात 64 ठिकाणी पीएम किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बियाणे, औषधे, अवजारे आणि खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. मात्र, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देखील याच केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. संपूर्ण देशामध्ये पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात 14 हजार 430 पीएम किसान समृद्धी केंद्र
महाराष्ट्रात 14 हजार 430 केंद्रांचा समावेश असून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात 670 केंद्र आणि शहरात 64 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानातील सिकर येथे केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी बियाणे, औषधे ही प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रातून (PM Kisan Samriddhi Kendra) उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रवीण पोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पीएम किसान समृद्धी केंद्र म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रावर (PM Kisan Samriddhi Kendra) शेतकऱ्यांना खते आणि कीटकनाशके खरेदी करण्याची तसेच अशी अनेक शेती उपकरणे, मिशनरी इत्यादी भाड्याने देण्याची सुविधा दिली जाईल. या केंद्रांवर शेतीशी संबंधित सल्ला आणि माती परीक्षण इत्यादी सुविधेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.
पीएम किसान समृद्धी केंद्राचा फायदा काय?
देशातील शेतकऱ्यांना शेती संबंधित वस्तू, जसे की धान्य किटकनाशके घेण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागले. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात होते, त्यासाठी आता खते, बियाणे शेती, माती परीक्षण आणि विविध प्रकारच्या शेतीशी संबंधित सर्व उपकरणे शेतकर्यांना सोयीस्कररित्या उपलब्ध करण्यासाठी पीएम किसान समृद्धी केंद्र (PM Kisan Samriddhi Kendra / One Nation One Fertilizer Scheme) योजना राबवण्यात येते. शेतीसंबंधित माहिती एकाच छताखाली मिळावी, यासाठी सरकारने नवीन योजना सुरू केली आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना शेतीशी संबंधित सर्व माहिती देता येईल आणि त्यासाठी त्यांना दोन किंवा तीन दुकानांमध्ये जावं लागणार नाही. अशाप्रकारे शेतकऱ्यांना PM किसान समृद्धी केंद्रांचा लाभ मिळेल . यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य किंवा उपकरणे एकाच ठिकाणी मिळतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :