Sharad Pawar : 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एन्ट्री, येवल्यात इतिहास घडणार?
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sharad Pawar : वयावरुन टीका करणाऱ्यांना शरद पवारांचं चोख उत्तर, 'वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल'
Sharad Pawar : वयावरुन टीका करणाऱ्यांना शरद पवारांचं चोख उत्तर, 'वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल'
Sharad Pawar : पंतप्रधान मोदी यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करा, आमचं त्यासाठी समर्थन - शरद पवार
Sharad Pawar : आता आमच्यावर जास्त जबाबदारी - शरद पवार
Sharad Pawar : स्वाभिमान कधी सोडणार नाही - शरद पवार
Sharad Pawar : आज कोणावरही टीका करणार नाही - शरद पवार
Sharad Pawar :'पुन्हा तीच चूक करणार नाही'
Sharad Pawar : माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागतो - शरद पवार
Sharad Pawar : संकटातही काही सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही - पवार
Sharad Pawar : शरद पवार यांच्या येवल्यातील सभेला सुरुवात
Ajit Pawar : इथे असलेले माझे भाजपचे कार्यकर्ते, माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. यासर्वांना माझे म्हणणे आहे की सर्वांनी कुठे ही एकमेकात अंतर न पडू देता एकत्रितरित्या काम करावं.
Ajit Pawar : गेले काही दिवस सरकार सातत्याने गडचिरोलीकडे लक्ष देत आहे. सरकारमधील महत्वाचे वरिष्ठ नेते गडचिरोलीची जबाबदारी घेत आहेत. आधी आर आर पाटील, नंतर एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आहेत. उद्दिष्ट एवढेच आहे की, इथला विकास होऊन नक्षलवाद नाहीसा झाला पाहिजे. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. फक्त विकासासाठी आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. कोणी काहीही बोलत असेल तरी आम्ही विकासासाठी आलो आहोत.
Ajit Pawar : गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. माझे प्रशासनाला म्हणणे आहे, जेव्हा cm, dcm आणि इतर मंत्री गडचिरोलीत येतात, मग मंत्रालयातील सचिवांनीही इथे आले पाहिजे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar : सरकार जनतेसाठी असते, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या हेच शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती चे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शपथ घेऊन पहिलाच कार्यक्रम गडचिरोलीत होत आहे, याचा आनंद आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. अशा वेळेत केंद्रात आणि राज्यात एकच विचारांचा सरकार असेल तर विकास तीव्रतेने होतो असे अजित पवार म्हणाले.
Gadchiroli : आज खऱ्या अर्थाने संपूर्ण सरकार आपल्या दारी आलं आहे. cm आणि दोन्ही dcm आले असल्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले. 7 लाख लोकांना आपण विविध लाभ देत आहोत. लोकांना वाटत आहे, सरकार आपल्या पाठीशी आहे, दारात येऊन सरकार देत असल्याची भावना लोकांची असल्याचे अत्राम म्हणाले.
Gadchiroli : गडचिरोलीत शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत. तिघांचेही नागपूरवरून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने आगमन झाले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -