एक्स्प्लोर

Fungal Infection : सावधान! पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका अधिक, मग काळजी कशी घ्याल?

Monsoon Fungal Infection : पावसाळ्यात भिजल्यावर किंवा जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो, हे टाळण्यासाठी काय करायचं जाणून घ्या.

Risk of Fungal Infection In Monsoon : पावसाळा सुरु झाल्यामुळे अखेर उन्हाच्या तडाख्यापासून मिळाला आहे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण, पावसाळ्यात अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये सर्दी, ताप यांसारख्या आजारांसोबत अनेक संसर्गजन्य आजारही वेगाने पसरतात. पावसाळ्यात आपण भिजल्यामुळे किंवा सतत पाण्यात राहिल्यामुळे फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) म्हणजे बुरशीजन्य आजार होण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची योग्यप्रकारे काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर, या सारख्या आजारांना बळी पडण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. बुरशीजन्य आजार म्हणजे, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि कशी ते जाणून घ्या.

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं?

आरामदायक कपडे वापरा

सुती किंवा इतर आरामदायक कापडाचं कपडे वापरा. यामुळे त्वचेला श्वास घेण्यास जागा मिळेल. सैल कपडे घातल्यामुळे  हवा शरीरात जाईल आणि शरीर ओलसर राहणार नाही. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहिल आणि बुरशीपासून संरक्षण होईल.

वैयक्तिक स्वच्छता राखा

फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचे हात आणि पाय नियमितपणे अँटी फंगल साबणाने धुवा. विशेषतः पावसात भिजल्यानंतर पायांमध्ये चिखल किंवा घाणेरडं पाणी यामुळे तुम्ही अनेक रोगजन्य विषाणूचा संपर्कात येता, यामुळे बाहेरून आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवा. तुमची नखे लहान आणि स्वच्छ ठेवा, यामुळे पावसाळ्यात तुम्हाला संसर्ग टाळता येईल.

त्वचा कोरडी ठेवा

ओले कपडे अधिक काळ अंगावर ठेवू नका. जास्त वेळ त्वचा ओली राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. पावसात भिजल्यानंतर स्वतःला पूर्णपणे कोरडं करा, शक्य असल्यास कपडे बदला किंवा इतर पद्धतीने कपडे सुकवण्याचा प्रयत्न करा. ओलावा राहिल्यास बुरशीचा धोका जास्त असतो. त्यामुळे शरीर मुख्यत: हात, पाय आणि काखेत ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्या.

हायड्रेटेड रहा

पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. योग्य आहार घ्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते, यामुळे तुमचं शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.

अँटीफंगल पावडर

त्वचा कोरडी ठेवण्यासाठी आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी तुम्ही अँटीफंगल पावडर वापरू शकता. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो, तेथे अँटीफंगल वापरणे फायदेशीर ठरेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

संबंधित इतर बातम्या : 

Fungal Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका, अशी मिळवा सुटका

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget