इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सिरीजसाठी टीम इंडियाची (Team india) घोषणा करण्यात आली असून भारताचा तोफगोळा म्हणजेच मोहम्मद शामीचे पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयच्या पुरुष निवड समितीने आगामी 5 सामन्यांच्या T-20 मालिकेसाठी भारती संघाच्या 15 सदस्यांची निवड केली आहे. त्यामध्ये, कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडेच देण्यात आली असून या संघात मोहम्मद शामीचे (Mohammad shami) पुनरागमन झाल्याने क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी  क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, काहीसे नैराश्यात असलेल्या टीम इंडियाला आता टी-20 सामन्यांतून स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. 


मायदेशी होम मैदानावर होत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात 22 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होत असून पहिला सामना कोलकात्यामधील ईडन गार्डनवर होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे, क्रिकेट चाहत्यांना ही मालिका म्हणजे पर्वणीच आहे. दरम्यान, टीम इंडियात मोहम्म शामीचे पुनरागमन झाले असून अक्षर पटेलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 


टीम इंडिया - 15


इंग्लंडविरुद्ध भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (C), संजू सॅमसन (wk), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (vc), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शामी , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल