Inflation :  महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक संपली; पावसाळ्यानंतर पुन्हा वज्रमूठ सभा होणार

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Aug 2023 10:52 PM
Kalyan News : भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार
Kalyan Crime News :  भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Read More
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक संपली; पावसाळ्यानंतर पुन्हा वज्रमूठ सभा होणार

Maharashtra Politics : मुंबईतील गरवारे क्लबमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक संपली आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा वज्रमूठ सभा होणार आहेत. 

Inflation : नाश्ताचे पोहे ते मुखशुद्धी करणारी बडीशेप ही महागली; मसाल्यापासून गहू, ज्वारी, तांदूळ, शेंगदाण्यांच्या भावात वाढ
Inflation : मागील काही दिवसात अन्नधान्याच्या किंमतीत अचानकपणे वाढ झाल्याने सामान्यांचे बजेट बिघडले आहे. Read More
औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे-अबू आझमींमध्ये जुंपली; फडणवीसांनी मध्यस्थी करत प्रकाश आंबेडकरांची केली पाठराखण
Vidhan Sabha Adhiveshan Updates: औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ, नितेश राणे-अबू आझमींमध्ये जुंपली. नेमकं काय घडलं? Read More
Nitin Desai : आलिशान ND Studio; गड-किल्ले, राजवाड्यांचे सेट्स... डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओबद्दल जाणून घ्या...
Nitin Desai : नितीन देसाई यांनी अनेक सिनेमांचं कला दिग्दर्शन करण्यासोबत एन.डी स्टुडिओची निर्मितीदेखील केली आहे. Read More
Nitin Desai : नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओवर होणार होती जप्तीची कारवाई; सूत्रांची एबीपी माझाला माहिती
Nitin Desai ND Studio : ठराविक मुदतीत पैशाची परतफेड न केल्यामुळे नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. Read More
Kolhapur News : लेकाने गळ्याला गळफास लावताच वडिलांचा सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मानसिक धक्क्याने मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक आत्महत्यांच्या घटनांची मालिका सुरुच आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमध्ये तरुणाने आत्महत्या केल्यानंतर वडिलांचा सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मृत्यू झाला. Read More
ExpressWay Accident: खंडाळा बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर पलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

ExpressWay Accident पुणे:  खंडाळा बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर पलटला आहे. या अपघातात  दोन जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रेलर हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.


 





Sambhaji Bhide : महात्मा फुलेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवले; नाशिकमध्ये संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल
Sambhaji Bhide : महात्मा फुले कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik) संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Read More
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात आज सूर्यदर्शन, शेतकरी चिंतेत, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम, पावसाचा अंदाज काय? 
Nashik Rain Udpate : पावसाचा दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी नाशिक जिल्ह्यात (Nashik) अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. Read More
Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, लगान ते जोधा अकबर, डोळे दिपवणारे सेट उभारले; कोण होते नितीन देसाई?
Nitin Desai : नितीन देसाई हे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. Read More
Maharashtra News: पशुपालकांनी पावसाळ्यात पशुधनाची अशी घ्यावी काळजी; 'या' उपाययोजना केल्यास जिवित हानी टाळता येईल
Maharashtra News: पावशाळ्यात तुमच्या पशुंची काळजी कशी घ्याल? यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स... Read More
घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अचानक संप; पगारवाढ, इतर सुविधांच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक
BEST Workers Strike: बेस्टच्या घाटकोपर डेपोमधील कंत्राटी चालक आज सकाळपासून अचानक संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत आहेत. Read More
Gautami Patil : हुल्लडबाजांचा गोंधळ, दगडफेक; गौतमी म्हणाली,"...तर मी कार्यक्रम बंद करेल"
Gautami Patil : अहमदनगरमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. Read More
Ulhasnagar: बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून दाम्पत्याची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये राहत असलेल्या पती-पत्नीने बंगल्याच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.