दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना
महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध झालेले शुद्धिपत्रक हे कोणालाही विश्वासात न घेता खोडसाळपणे अधिकाऱ्यांनी आदिवासी विभागाच्या संगनमताने प्रसिद्ध केले होते असे पडळकर म्हणाले. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ हे शुद्धिपत्रक रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी ही संपर्क साधून , दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या असे पडळकर म्हणाले.
ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज
कपाळावर जो आडवा भंडारा लावतो तो समजाची आडवी मांडणी करतो, पण जो आडवा येतो त्याला आडवा करतो असेही पडळकर म्हणाले. आरेवाडीमधील बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात पडळकर बोलत होते. ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज असल्याचेही पडळकर म्हणाले.
वाद होण्यासाठी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जातेय
आता भांडणे करायची ही वेळ नसल्याचे पडळकर म्हणाले. ओबीसी-मराठा वाद पेटवला जातोय, यामागे अनेक कारणे असल्याचेही ते म्हणाले. वाद होण्यासाठी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जात आहे. ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज असल्याचे पडळकर म्हणाले. ओबीसीतून आरक्षण भेटले तर कल्याण होते असे सांगून गरीब मराठा समाजाला का फसवले जातंय? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला. गावगाड्यात मराठा-ओबीसी हा वाद अनाठायी असल्याचे पडळकरांनी सांगितलं. सरकारनं धनगर समाजाला आरक्षण द्यावे आणि समाजाला भंडारा उधळण्याची संधी द्यावी असे मतही पडळकर यांनी व्यक्त केलं.
आमचे डॉक्युमेंट रद्द करण्याचे षडयंत्र, बजाज नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : प्रकाश शेंडगे
धनगर आरक्षणाचा जी आर काढण्यासाठी जे कागदपत्र दिले आहेत, त्यात एक स्टँप ड्युटी देण्यात आली असल्याचे मत प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केले. काल एक पत्र काढण्यात आले धनगड असं वाचावे असे सांगण्यात आले आहे. हे आमचे डॉक्युमेंट रद्द करण्याचे षडयंत्र करण्यात आल्याचे शेंडगे म्हणाले.
पण रातोरात आम्ही ते बदल करण्यास सांगितले. बजाज नावाच्या अधिकाऱ्याने कोणत्याही मंत्र्याला न विचारता शुधीपत्रक काढले आहे. आम्ही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि रद्द करण्याचे दुसरे शुद्धिपत्र काढण्यात आले. बजाज नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शेंडगे यांनी दिली. या अधिकाऱ्याल निलंबीत करावं आणि धनगर समाजाची माफी मागावी असेही शेंडगे म्हणाले. आजच्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेण्याची मागणी केली आहे. पण पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येईल. फडणवीस यांनी शब्द दिला होता, देवा भाऊ जो बोलता है वो करता है असे शेंडगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: