एक्स्प्लोर

Kolhapur News : लेकाने गळ्याला गळफास लावताच वडिलांचा सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मानसिक धक्क्याने मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक आत्महत्यांच्या घटनांची मालिका सुरुच आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमध्ये तरुणाने आत्महत्या केल्यानंतर वडिलांचा सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मृत्यू झाला.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक आत्महत्यांच्या घटनांची मालिका सुरुच आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीमध्ये तरुणाने आत्महत्या केल्यानंतर वडिलांचा सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मृत्यू झाला. विजय आनंदा परीट या 32 वर्षीय युवकाने सोमवारी संध्याकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, चार वर्षांची मुलगी, वडील, भाऊ, भावजई असा परिवार आहे. 

वयाची पस्तिशी सुद्धा पार न केलेल्या मुलाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने वडिल आनंदा परीट यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. मुलाने केलेल्या आत्महत्येनंतर घरात सन्नाटा पसरला असतानाच मंगळवारी दुपारी वडिल आनंदा खंडू परीट (वय 62) यांचे प्रचंड मानसिक धक्का बसल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन  झाले. यामुळे लेकाची राख थंड होण्यापूर्वीच वडिलांवरही अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. मुलाच्या आत्महत्येपाठोपाठ वडीलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजयच्या कपडे इस्त्रीच्या व्यवसायात वडील आनंदा परीट हे त्याला मदत करीत होते.

विजयने राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पट्टणकोडोलीमद्ये नवीन बसस्थानक परिसरात त्याच्या घराचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून घरचे सर्वजण इंगळी रोडवर भाड्याच्या घरात रहायला गेले होते. बांधकामाच्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहून तेथीलच जुन्या खोलीत त्याने आत्महत्या केली. 

पत्नीच्या आकस्मिक मृत्यूनंतर पतीने तीनच महिन्यात गळफास घेत जीवनयात्रा संपवली

दरम्यान, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या पतीने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कागल तालुक्यता घडली होती. संदीप भगवान बेलवळे (वय 39, रा. बेलवळे खूर्द, सध्या रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. आईच्या आकस्मिक मृत्यूने आणि वडिलांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने त्यांचा  एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे. पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या संदीप यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या मातोश्री त्यांच्यासोबत कोल्हापूर शहरात राहत होत्या. त्या सातत्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, तरीही त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. 

17 वर्षांच्या संसाराचा धक्कादायक शेवट 

संदीप आणि त्यांची पत्नी अनुराधा यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. शेती तसेच व्यवसाय त्यांचे कुटुंब स्थिरस्थावर झाले होते. त्यांना एकुलता एक 14 वर्षांचा मुलगा आहे. सर्व काही आनंदात सुरु असतानाच एप्रिल 2023 मध्ये संदीप यांच्या पत्नी अनुराधा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर संदीप यांनी पत्नीच्या विरहाने नैराश्याने ग्रासले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Kolhapur Crime News: अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
Embed widget