अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वसामान्य भारतीयांनीही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरतन टाटा यांच्या पार्थिवावर आज वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाल्यानंतर रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या NCPA मध्ये सकाळी 10 ते दुपारी चार पर्यंत ठेवण्यात आले होते.
रतन टाटांचे विविध धर्मातील धर्मगुरुंनी अंत्यदर्शन घेतले. तसेच, राजकीय दिग्गज नेत्यांनी व सेलिब्रिटींनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या सर्वांनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले.
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक मधू भांडारकर, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
वरळी स्मशानभूमीतील प्रार्थना सभागृहात जवळपास 200 लोक जे अगदी जवळचे आहेत, तेच अंत्यसंस्कारासाठी होते. मात्र, स्मशानभूमीबाहेर मोठी गर्दी होती.
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.10) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले.
केंद्रीयमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक राजकीय मंडळी अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमीत पोहोचली होती.
अभिनेता आमीर खान व त्याची पूर्वाश्रमीची किरण राव याही रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आल्या होत्या. राजपाल यादव यांनीही वरळी स्मशानभूमित टाटांच्या अंतिम संस्काराला उपस्थिती लावली.
स्मशानभूमीत उद्योगपती आणि बिर्ला ग्रुपचे चेअरमन व इतर दिग्गज उद्योगपतीही उपस्थित होते. तर, स्मशानभूमीत मुंबई पोलिसांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली.