Kalyan News : भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार
Kalyan Crime News : भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Kalyan Crime News : शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीने पाठलाग केला होता. संधी मिळताच आरोपी विशालने एका कोपऱ्यात तिला खेचत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थीनिने तिची सुटका करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते. नराधम विशाल याचा माज इतका आहे की पत्रकारांनी पत्रकारांच्या कॅमेरा कडे बघून त्याने victory ची साईन दाखवली.
नेमकं काय घडलं?
आज सायंकाळी एक अल्पवयीन विद्यार्थिनी तिचा क्लास आटोपून घरी परतत होती. यावेळी विशाल याने तिचा पाठलाग केला आणि तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन विद्यार्थिनींना त्याला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून ती निसटली. तिच्यासह तिच्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली. तातडीने आरोपी विशाल गवळी याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप न करता दोन बोटे उंचावून विजयाची खून दाखवली. यावरून त्याला किती माज आहे, हे पोलिसांसमोर उघड झाले. विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
देशात तीन वर्षांत 13 लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता
भारतात मुलींशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. यातील केवळ काही प्रकरणं पोलीस ठाण्यात पोहोचतात, तर काहींची नोंद देखील होत नाही. काही प्रकरणं समोर येत नाहीत. कधी मुलीवर बलात्कार होतो, तर कधी अपहरण… 2019 ते 2021 या तीन वर्षांच्या कालावधीत भारतात बेपत्ता झालेल्या महिलांची (Missing Women) संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ तीन वर्षांत भारतातील 13.13 लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. यातील बहुतांश मुली आणि महिला मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) बेपत्ता झाल्या आहेत. मध्य प्रदेशनंतर सर्वाधिक मुली या पश्चिम बंगालमधून बेपत्ता झाल्या आहेत.