Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंच्या नेतृत्वातील मनसेनं नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन केली होती, तेव्हा मनसेच्या सत्ताकाळात नाशिकमध्ये बोटॅनिकल गार्डनची उभारणी करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा ग्रुपच्या सहाय्याने मनसेच्या सत्ताकाळात हे नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनची उभारणी झाली होती. या गार्डनच्या उद्घाटनाला रतन टाटा उपस्थित होते. यावेळी, गार्डनच्या उद्घाटनाबद्दल राज ठाकरेंचं त्यांनी कौतुकही केलं होतं.
राज ठाकरे यांनी या बोटॅनिकल गार्डनच्या उद्घाटनानंतर रतन टाटांसोबत भोजन केलं, तसेच गप्पाही मारल्या होत्या. विशेष म्हणजे हे गार्डनर केवळ रतन टाटा यांच्यामुळेच शक्य झाल्याचंही राज यांनी म्हटलं होतं.
या कार्यक्रमासाठी रतन टाटा विमानाने आले असता, राज ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर थांबले होते.
नाशिकमधील विमानतळावरच राज ठाकरेंनी रतन टाटांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतला होता, राज ठाकरेंचा हा फोटो समाजमाध्यमावरुन नेहमीच समोर येतो
राज ठाकरेंनी आजही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना काही निवडक फोटोंतून त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत, त्यामध्ये नाशिक विमानतळावरील हा त्यांच्यातील प्रेमळ नात्याचा फोटो दिसून येतो.
राज ठाकरे व रतन टाटा यांच्यातील हा क्षण अनेकांना भावूक करणारा होता, कारण राज ठाकरे सहसा कोणाचे चरण स्पर्श करत नाहीत. त्यामुळेच राज ठाकरेंचा हा फोटो अनेकांना भावतो.
रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून त्यांच्यातील चांगुलपणाची हजोरा उदाहरणे प्रत्येकजण आपल्या अनुभवातून शेअर करत आहे