Nitin Desai : नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओवर होणार होती जप्तीची कारवाई; सूत्रांची एबीपी माझाला माहिती
Nitin Desai ND Studio : ठराविक मुदतीत पैशाची परतफेड न केल्यामुळे नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
![Nitin Desai : नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओवर होणार होती जप्तीची कारवाई; सूत्रांची एबीपी माझाला माहिती Nitin Desai ND Studio Nitin Desai ND Studio to be confiscated ABP Maja information of sources know details Nitin Desai : नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओवर होणार होती जप्तीची कारवाई; सूत्रांची एबीपी माझाला माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/02/f8a53e2eb02ca1700103fc75f666bdfa1690962659280254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nitin Desai ND Studio : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. एन.डी. स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेत त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण समोर आलं नसलं तरी ठराविक मुदतीत पैशाची परतफेड न केल्यामुळे नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई करण्यात येणार होती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एका वित्तीय संस्थेने एन.डी स्टुडिओ जप्त करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नसल्याने अजून स्टुडिओची जप्ती झाली नव्हती. देसाई आणि त्यांच्या पत्नीने या कंपनीकडून कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड झाली नसल्याने कंपनीने त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
एन.डी.स्टुडिओवर होणार होती जप्तीची कारवाई
नितीन देसाई आणि त्यांच्या पत्नीने वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्याची परतफेड झाली नसल्याने कंपनीने त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई केली, ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे देसाई हे आर्थिक विवंचनेत होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 180 कोटींचं कर्ज न फेडल्याने नितीन देसाई चिंतेत होते, व्याजासह एकूण 250 कोटींचं देणं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) म्हणाले,"आज सकाळी नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असून पोलीस सध्या याप्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत, असे रायगडचे एसपी सोमनाथ घार्गे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. देसाई यांना स्टुडिओसंदर्भात आर्थिक अडचणी असून ते आर्थिक ताणतणावात होते".
नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.
संबंधित बातम्या
Nitin Desai : दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, लगान ते जोधा अकबर, डोळे दिपवणारे सेट उभारले; कोण होते नितीन देसाई?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)