Jalna Accident : आयशरची दुचाकीला धडक, तीन चिमुकल्या मुली जागीच ठार, मंठा रोडवरील घटना

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 25 Jun 2023 10:13 PM
Jalna Accident : आयशरची दुचाकीला धडक, तीन चिमुकल्या मुली जागीच ठार, मंठा रोडवरील घटना

जालना शहरातील मंठा रोडवरील पुलावर आयशरने दुचाकीला धडक दिल्याने तीन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. वडिलांसोबत सुट्टीच्या निमित्ताने खरेदीसाठी निघालेल्या दुचाकीवरील तीन मुलींना जीव गमवावा लागला. भरधाव वेगात असलेल्या आयशरला ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक बसल्याने तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार पित्याला जखमी अवस्थेत खाजगी दवाखान्यात हलवण्यात आलं. दरम्यान आयशर अपघात स्थळी सोडून चालक फरार झाला आहे. नुरेन शेख -वय 6 वर्ष, आयेशा शेख- -वय 5 वर्ष, अदाबिया सय्यद- वय वर्ष 3 वर्ष- असे या मयत झालेल्या मुलींची नावे आहेत.

Mumbai Rains: विलेपार्ले परिसरातील इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू

मुंबईतील विलेपार्ले परिसरातील नानावती हॉस्पिटलला लागून असलेली G+2 इमारत दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कोसळली. इमारतीत अडकलेल्या 5 जणांची सुटका करण्यात आली आहे, ज्यांना उपचारांसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इमारतीत अडकलेल्या 5 जणांपैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Rains: विद्याविहार येथे इमारत पडून अपघात; सात तास उलटूनही दोन जण ढिगाऱ्याखालीच

Mumbai Rains: विद्याविहार येथील तीन मजली इमारत 'प्रशांत निवास' खचून सात तास उलटले आहेत. तरीही इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबापैकी अलका आणि नरेश पालंडे अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीएआरएफने शर्थीचे प्रयत्न करुनही या दोघांना बाहेर काढण्यात यश आलं नाही.अखेर, आता उभे असलेले दोन मजले पाडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

Sangli News: सांगलीच्या खासदाराचे टार्गेट फक्त प्रॉपर्टी वाढवण्याचे, या खासदाराला पाडायची वेळ आली; विशाल पाटलांचा हल्लाबोल 
प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महानिर्धार मेळाव्यात दमदार भाषण केले. यावेळी त्यांनी विश्वजीत कदम यांचे नेतृत्व मान्य करत विश्वजीत कदम यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली. Read More
Trimbakeshwer Anjneri : 'रोप-वे थांबवा, जटायू वाचवा'; ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी जटायू पूजन, अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवेला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम
Trimbakeshwer Anjneri : ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी जटायू पूजन करत अंजनेरीच्या रोपवेला पर्यावरण प्रेमींचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. Read More
Kolhapur News: माजी नगरसेविका, पोलीस अधिकाऱ्याकडून 1 कोटीच्या खंडणीसाठी त्रास; पोटच्या मुलाशी गैरवर्तणूक अन् संतोष शिंदेंनी कुटुंबासह केला भयावह शेवट
सुसाईड नोटची माहिती मिळताच गडहिंग्लजमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. तसेच जोवर सुसाईड नोटमध्ये नावे असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेहांना हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. Read More
Jalgaon Jashodaben Modi : पीएम मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी जळगावात घेतलं ओंकारेश्वराचे दर्शन, वडाच्या पूजेसह मंदिरात विधिवत आरती 
Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या जगन्नाथ रथोत्सवाच्या दर्शनासाठी जात असताना जळगावात (Jalgaon) थांबल्या. Read More
Crop Insurance : एक रुपयात विम्याची नुसतीच घोषणा, मुदत संपत आली असतानाही सरकरी आदेश निघेना; दानवेंचा गंभीर आरोप
Crop Insurance : काही पिकांची विमा भरण्याची मुदत संपली असून, अजूनही सरकारने आदेश काढला नसल्याचं आरोप दानवे यांनी केला आहे.  Read More
Nashik Bus Fire : बस आगारात आली, प्रवासी उतरले अन् अचानक बसने पेट घेतला; नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली
Nashik Bus Fire : नांदगाव येथील बसस्थानकात लावलीच होती, तेवढ्यात बसने अचानकपणे पेट घ्यायला सुरुवात केली. Read More
Kolhapur Crime: कोल्हापुरात विनापरवाना आयात केलेला तब्बल 17 लाखांचा उच्चप्रतीचा दारुचा साठा जप्त
कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने तब्बल 17 लाख 28 हजार रुपयांचा उच्च प्रतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. महसूल बुडवुन आयात केलेला साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचा दिसून आला.  Read More
Manhole Death in Gowandi : मॅनहोलमध्ये सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू; मुंबईतील घटनेने खळबळ
Manhole Death in Gowandi : गोवंडीमध्ये मॅनहोलमध्ये सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान  


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून आज प्रस्थान होणार आहे पालखी प्रस्थान दु. 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे.  यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक खासदार-आमदार उपस्थित राहणार आहेत.  १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.


आज राष्ट्रावादीचा 25 वा वर्धापन दिन 


   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनासाठी आज शरद पवार दिल्लीत. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल.  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीतले इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार  आहेत. राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई  विभागीय  राष्ट्रवादी  काँग्रेस  पार्टीच्या  वतीने आज सकाळी  09.30 वाजता मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम  आयोजित केलाय. यावेळी खासदार जयंत पाटील , छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवार उपस्थित राहणार आङेत. 


  नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा


 नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उपक्रमाअंतर्गत नांदेडमध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अतुल सावे, प्रवीण दरेकर आणि इतर नेते उपस्थित राहतील. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर


 वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतील. सकाळी 11 वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. त्यानंतर भाजप कार्यलयात आढावा बैठक घेणार आहेत.  गेल्या काही दिवसांपासून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केलीय त्या दृष्टीने नवीन नियुक्त्या केल्यात त्यापासून महाजन याना नाशिकपासून दूर ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यानंतर महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.