Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
रविवारचा दिवस हा अपघाताचा दिवस ठरल्याचं दिसून आलं, कारण मुंबईतील वरळी येथील हीट अँड रनची पहिली घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर, पुणे, छ.संभाजीनगर, नालासोपारा,जुन्नर आणि कॉलेजमध्ये आगीची घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील वरळीमध्ये हीट अँड रनप्रकरण घडलं असून शिवसेना उपनेत्याच्या मुलाच्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली असून याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.
पुण्यातील टिळक रोड, एस.पी कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहात विद्युत पुरवठा करणाऱ्या सिटी मीटरमध्ये आगीची घटना घडली. अग्निशमन दलाकडून तात्काळ आगीवर नियंत्रण ठेवण्यात आलं.
जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला.
या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत.
नालासोपारा पूर्वच्या श्रीराम नगर येथे एका भरधाव ऑईल टँकरने रिक्षाला जोरदार धडक देत, पाच दुकानांच्या शेडला ठोक्कर दिली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
छत्रपती संभाजीनगरहुन बीडकडे जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी फाट्याजवळ चारचाकी कारने स्कुटीला उडविले. त्यामध्ये, स्कुटीवरील पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले आहेत. कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
पुण्यातील हिराबाग चौकात दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, चारचाकी वाहन दुचाकी गाडीवर चढल्याचं दिसून येत आहे. या अपघातात दुचाकी सवार गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.