Amravati Blast : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) काल शनिवाराच्या रात्री बॉम्ब सदृश्य वस्तू फेकण्याच्या घटनेमुळे संपूर्ण कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली होती. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास कारागृहात मोठा आवाज झाल्याची घटना घडली. त्यानंतर अमरावतीचे (Amravati News) सीपी-डीसीपी आणि बॉम्ब निकामी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. रात्री अचनाक कारागृहात स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. 6 आणि 7 क्रमांकाच्या बॅरेकसमोर हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली होती. या संपूर्ण प्रकारानंतर या स्फोटाच्या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेतला असता यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कारण ऐकून पोलिसांकडून देखील आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.  


चक्क कारागृहात कैदी मित्राच्या वाढदिवसानिमित्त फोडले बॉम्ब 


अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात काल शनिवाराच्या रात्री झालेल्या स्फोटाचा छडा पोलिसांनी लावला आहे. यात कारागृहात बंद असणाऱ्या एका कैदीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या साथीदारांनी चक्क बॉम्ब फोडून हा आनंद साजरा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती कारागृहाच्या मागून जाणाऱ्या अमरावती- नागपूर एक्सप्रेस हायवेवरून हे बॉम्ब फोडून हा कैद्यांच्या मित्रानी हा आनंदउत्सव साजरा केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता या प्रकरणील आरोपींची सोध घेत पोलिसांनी हा प्रकार उजेडात आणला आहे.


पोलीसांनी केलं दोघांना अटक


विशेष म्हणजे कारागृहामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू फेकणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. हर्ष शेरेकर आणि रोहित काळे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हे दोघेही अमरावती शहरातील बेनोडा परिसरातील रहिवासी आहेत. मात्र या घटनेमुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न नव्याने चर्चेत सापडला आहे. तर दुसरीकडे हे धाडसी कृत्य करण्याचे धाडस करणाऱ्या या घटनेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात पोलिसांचा वचकच उरलेला नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.


नेमकं प्रकरण काय?


अमरावतीच्या कारागृहात शनिवारच्या रात्री अचानक फटाक्यांची आतषबाजी किंवा बॉम्ब फुटल्याप्रमाणे मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेचा तपास करण्यासाठी तातडीनं फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं. मिडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरून फटाका किंवा बॉम्ब कारागृहात बॉलद्वारे फेकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. कारागृहात बॉम्ब सदृश वस्तू फेकणारी व्यक्ती कोण? आणि असं करण्यामागे या व्यक्तीचा नेमका हेतू काय? याचा कसून तपास कारागृह प्रशासनाकडून सुरू करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या