एक्स्प्लोर

Trimbakeshwer Anjneri : 'रोप-वे थांबवा, जटायू वाचवा'; ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी जटायू पूजन, अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवेला पर्यावरणप्रेमींचा विरोध कायम

Trimbakeshwer Anjneri : ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी जटायू पूजन करत अंजनेरीच्या रोपवेला पर्यावरण प्रेमींचा कडाडून विरोध करण्यात येत आहे.

Trimbakeshwer Anjneri : 'चलो ब्रह्मगिरी..संत बनके, हटावो रोपवे हनुमान बनके, खासदार मठ्ठ, आमदार लठ्ठ, बाळा! धरू नको रोपवेचा हट्ट' असे विविध फलक हाती घेत नाशिकच्या पर्यावरण प्रेमींनी अंजनेरी ते ब्रह्मगिरी (Anjneri) रोपवेला विरोध केला. एकीकडे गिधाड (Vulture) नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. मात्र दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सर्रास पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून अंजनेरी-ब्रह्मगिरी असा रोप-वेचा तयार करण्याचा घाट घातला जात आहे. नुकतीच या कामासाठी निविदा प्रक्रियाही खुली करण्यात आली आहे. त्यामुळे रोप-वे तयार करण्याच्या कामाच्या हालचालींनाही वेग आला आहे. दुसरीकडे नाशिकच्या (Nashik) पर्यावरणप्रेमी संघटनांच्या माध्यमातून 'रोप-वे थांबवा, जटायू वाचवा' असा नारा देत असून रोपवेला तीव्र विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व परिवाराण प्रेमींनी एकत्र येत ब्रम्हगिरी गाठले, ब्रम्हगिरीला जाणाऱ्या पायऱ्यांवर जटायू पूजन करत रोपवे अंजनेरीसह ब्रम्हगिरीसाठी (Bramhgiri) धोकादायक असल्याचे सांगितले. 

एकीकडे नाशिकसह (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहर कुंभनगरी म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या पंचवटी (Panchavati), तपोवनाचा उल्लेख रामायणात केल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार श्रीराम वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर याच पंचवटीतून सीतेचे रावणाने हरण केले, तेव्हा ज्या जटायू पक्षाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, तो पक्षी गिधाड होता, असे सांगितले जाते. या गिधाडाचे घर म्हणून अंजनेरी-ब्रह्मगिरीची पर्वतरांग ओळखली जाते. या ठिकाणी गिधाडांचे प्रजनन होते, मात्र सद्यस्थितीत गिधाडांची संख्या कमालीची घटली असून अशातच रोपवेचा घाट घातला जात आहे. त्यामुळे गिधाड प्रजातीवर आणखी संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचा परिणाम परिसंस्थेवर होत असल्याचे समोर आले आहे. मात्र दुसरीकडे विकासाच्या नावाखाली वृक्षतोड नैसर्गिक साधन संपत्तीला तडा देऊन प्रकल्प राबवले जात आहेत. 

ब्रम्हगिरीवर जटायू पूजन 

अंजनेरी पर्वत हा जैवविविधतेने परिपूर्ण असल्यामुळे येथे अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा संचार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गिधाड बिबट्या, वाघाटी, मोर, खोकड इत्यादी प्राणी संचार करताना दिसून येतात. तसेच एक दुर्मिळ वनस्पतीची जगभरातून फक्त अंजनेरी पर्वतावर आढळून येते. त्याचबरोबर अनेक दुर्मिळ वनौषधींचा गड म्हणून अंजनेरी पर्वताकडे पाहिलं जातं. मात्र सद्यस्थितीत होऊ घातलेल्या रोपवेमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत ब्रम्हगिरीवर जटायू पूजन करण्यात येऊन रोपवेला कायमच विरोध राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Anjneri Ropeway : अंजनेरी ते ब्रह्मगिरी पर्वत 'रोप-वे'चीसाठी निविदा निघाली, 376 कोटींचा प्रकल्प, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Rohit Pawar : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Election Commission : निवडणूक आयोग म्हणजे BJP ची एक्स्ट्रा बॉडी
Rohit Pawar on Jay Pawar : जय पवार निवडणूक लढवणार? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार?
Rohit Pawar on MNS : मनसेला मविआत घेण्याबाबत शरद पवारांचं मत काय?
Pawar Politics: 'भाजपसोबत जाऊ नका', Sharad Pawar यांचा आदेश; Ajit Pawar गटासोबत युतीचे संकेत?
Rohit Pawar EXCLUSIVE : स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Rohit Pawar : अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
Tata Nexon की Maruti Brezza रोजच्या प्रवासासाठी कोणती कार अधिक फायदेशीर?
BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा 'ब्राझील कारनामा' समोर आणताच भाजपचा संताप; परदेशातून प्रेरणा मिळत असल्याचा केला आरोप
Embed widget