Sindhudurg News: सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका उद्यापासून सुरू होणार; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
13 Jun 2023 11:22 PM
जाहिरात देणारा अज्ञात, शिवसेनेचा काहीही संबंध नाही - शंभुराज देसाईंकडून सारवासारव
Eknath Shinde And Devendra Fadanvis : या जाहिरातीशी शिवसेनाचा काहीही संबंध नाही, जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
Read More
Sindhudurg News: सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका उद्यापासून सुरू होणार; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
Sindhudurg Osargaon Toll : सिंधुदुर्गमधील ओसरगाव टोल नाका उद्यापासून सुरू होणार आहे. स्थानिकांनी टोल वसुलीला विरोध दर्शवला आहे.
Read More
Ashadhi Wari 2023: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी टोल माफ; आजपासून स्टीकर्स मिळणार, जाणून घ्या सर्व माहिती
Ashadhi Wari 2023 Toll: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी, वारकरी, पालखीतील वाहनांसाठी टोल माफीचे स्टीकर्स आजपासून देण्यास सुरुवात झाली आहे.
Read More
Yavatmal: बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या तत्कालीन अध्यक्षा आणि सीईओंकडून 97 कोटींच्या नुकसानभरपाईचे आदेश
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष संचालक आणि सीईओंसह अधिकार्यांकडून आर्थिक नुकसानीची 97 कोटी दोन लाख 17 हजार 758 रुपये रक्कम वसूल करण्याचे आदेश. सहकारी संस्थेच्या अपर निबंधकांनी दिले आदेश.
महिला बँकेचे कर्ज वाटपानंतर वसुली अभावी झालेल्या नुकसानीची संबंधितांवर जबाबदारी निश्चित.
अध्यक्ष विद्या केळकर यांचे वर 50 कोटींपेक्षा अधिक तर सीईओ सुजाता महाजन यांच्यावर 25 कोटींपेक्षा अधिकची वसुली निश्चित.
ही रक्कम वसूल करून बँक निधीमध्ये जमा करावी असे अपर निबंधक शैलेश कोतमीरे यांचे आदेश.
Solapur News: सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या 'चिमणी'वर हातोडा पडणार; उद्यापासून कारवाईला सुरुवात?
Solapur News: सोलापूरमधील सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवर अखेर आता हातोडा पडणार आहे... उद्यापासून 14 जून पासून कार्यवाहीला सुरुवात होणार आहे.
Read More
Shivsena Advertisement : एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय... देवेंद्र फडणवीस हसले आणि हात जोडून निघून गेले; देवेंद्र फडणवीसांचे सूचक मौन
Devendra Fadnavis On Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांना सर्वाधिक जनतेला मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे अशा आशयाची एक जाहिरात शिवसनेने प्रसिद्ध केली आहे.
Read More
Wardha: वर्ध्यातील धानोडी बहाद्दरपुर येथे भीषण आग
वर्धा : धानोडी बहाद्दरपुर येथे भीषण आग लागली आहे. आगीत मोठ्या प्रमाणात ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले. धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पतून उपसा सिंचनाचे काम सुरु आहे. या कामाचे साहित्य ठेवलेल्या स्टॉक पॉईंटला भीषण आग लागली आहे. विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत जैन एरिगेशन या कंपनीला काम देण्यात आले आहे . या योजने अंतर्गत आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना ड्रीप लावून दिली मोफत सिंचनाची सोय जातं आहे
Maharashtra headlines : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Read More
MRF Share Price: एक लाखाचा एक शेअर... MRF टायर कंपनीनं रचला इतिहास, लाखांचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक
MRF Share Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे.
Read More
PM Modi : 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : मोदी
PM Modi Speech : देशातील 70 हजार तरुणांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Read More
Reaction on Jack Dorsey Claim: विरोधकांचं टीकास्त्र, तर केंद्र सरकारकडून प्रत्युत्तर; ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Reaction on Dorsey Claim: केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या दाव्यांवर प्रत्यत्तर दिले आहे. तर डोर्सी यांच्या दाव्यामुळे विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला आहे.
Read More
Cyclone Biparjoy : चक्रीवादळाचं वाढतं संकट! 'बिपरजॉय'चं अतितीव्र श्रेणीत रुपांतर, भारताच्या किनारपट्टीवर धडकणार
Biporjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळाचं अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झालं आहे. भारताच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका आहे.
Read More
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज डोंगरगणकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंची पालखीचा आज बीडमध्ये मुक्काम
Pandharpur Wari 2023 : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा अकरावा दिवस आहे.
Read More
'शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारची धमकी', माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा
Jack Dorsey Interview : ट्विटरचेमाजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर मोठा आरोप केला आहे. मोदी सरकारकडून दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Read More
'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख
Maharashtra Politics : आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read More
Morning Headlines 13th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Read More
SIPRI Report : भारताची तयारी पाहुन उडेल पाकिस्तान अन् 'ड्रॅगन'ची झोप; हद्दीत घुसून थेट हल्ल्याची तयारी
India China Pakistan Relation : सिपरी अहवालात (SIPRI Yearbook 2023) समोर आलं आहे की, एका वर्षात चीनच्या आण्विक साठ्यात वाढ झाली आहे. यासोबतच पाकिस्तानही तसा प्रयत्न करत आहे.
Read More
Employment Fair: PM मोदी 70 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र देणार; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार
Employment Fair: केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत मंगळवारी (13 जून) देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान मोदी 70 हजार तरुणांना त्यांच्या नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचं वाटप करणार आहेत.
Read More
Cyclone Biparjoy : 48 तासांत भारतात धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ; गुजरातला ऑरेंज अलर्ट, NDRF तैनात
Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Read More
Ram Mandir : ठरलं! 'या' दिवशी होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, पंतप्रधान मोदींना पाठवलं निमंत्रण; त्यानंतर भाविकांना घेता येणार दर्शन
Ram Mandir, Ayodhya : राम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. यासाठी सर्वतोपरी तयारी सुरु आहे.
Read More
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे.
Ads by
WTC चा अंतिम सामना
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
पालखी सोहळा
- त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे.
- शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे.
राष्ट्रीय
हरियाणा - फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत. कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट उपस्थित राहणार
दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता बैठक होणार
मुंबई
- शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे
- मुंबई-गोवा महामार्गावर (एनएच-66) मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले अॅड. ओवैस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे.
- राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
पुणे
- जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. सध्या ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे.
- जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद सुरु असताना या विश्वस्तांन एकत्र येत त्यांची भुमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत.
नवी मुंबई
- तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन समारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत
अहमदनगर
- कथित लव जिहाद प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहा प्रकरण घडल्याच किरीट सोमय्यांचा दावा आहे.
- भाजप खासदार सुजय विखे पाटलांची पत्रकार परिषद
- शिर्डीमध्ये काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे कॅनॉल पाणी जलपूजन असून संध्याकाळी 4 वाजता सभा होणार
सांगली
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जत तालुक्यात 55 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता.