एक्स्प्लोर

जाहिरात देणारा अज्ञात, शिवसेनेचा काहीही संबंध नाही - शंभुराज देसाईंकडून सारवासारव

Eknath Shinde And Devendra Fadanvis : या जाहिरातीशी शिवसेनाचा काहीही संबंध नाही, जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. 

Eknath Shinde And Devendra Fadanvis : ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या जाहिरातीवरुन सारवासारव करण्यात येत आहे. या जाहिरातीशी शिवसेनाचा काहीही संबंध नाही, जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. 

आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाचा काहीही संबध नाही. हितचिंतकाने ही जाहिरात दिलेली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर 30 वर्षापूर्वी केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांची वादग्रस्त जाहिरातीवर दिली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आमच्या मनात आहेत म्हणून फोटोत नसले तरी चुकीचा अर्थ काढू नये, असेही ते म्हणाले. 

युतीतील वातावरण बिघडणारी जाहिरात  - दरेकर

अशा प्रकारच्या जाहिराती देणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. एखाद्या सर्वेमध्ये जर अशाप्रकारे शिंदे यांना पसंती लोकांची आली असेल तर चांगलं आहे. जाहिरात केल्याच्या अडचण नव्हती, पण यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कमी पसंती आहे, अशा प्रकारचे दाखवण्याचं काय प्रयोजन आहे ? हे आम्हाला कळलं नाही, असे दरेकर म्हणाले.

हा खोडसाळपणा कोणी केला ? शिवसेनेने जाहिरात केली असेल तर ते अयोग्य आहे. त्यांनी जर जाहिरात दिली नसेल तर युतीमध्ये  मिठाचा खडा कोण टाकतय?? अजून तरी जाहिरात कोणी दिली याची माहिती मला मिळाली नाही. अशा जाहिराती देऊन दुसऱ्याला कमी लेखण्याचा कारण नाही. यामुळे युतीमधील वातावरण खराब होईल...त्यामुळे युतीत विसंवाद होऊ शकतो. देवेंद्र फडणीस किती लोकप्रिय आहे महाराष्ट्राला माहिती आहे. या जाहिराती मागे काय आहे ? हे जाहिरात देणारे सांगू शकतील... हे जर दबाव तंत्र असेल तर युतीत योग्य नाही. शिवसेनेचे नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. एकमेकांचे नेत्यांचा सन्मान केला पाहिजे, त्याचा फायदा विरोधी पक्ष घेतील. माझं स्पष्ट मत आहे ही जाहिरात अयोग्य आहे... युतीतील वातावरण बिघडणारी जाहिरात आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले. 


जाहिरातमध्ये नेमकं काय आहे ? 

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget