(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra headlines : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजुर
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटीची मान्यता देण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली, आग धुमसल्याने महामार्ग पोलीसांचा निर्णय
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जण दगावल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलावर एक केमिकल टँकर भरधाव वेगामुळे पलटी झाला आणि त्यानं पेट घेतला. मात्र पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं, तसंच काही वाहनांवरही सांडलं, ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला. (वाचा सविस्तर)
'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'; शिवसेनेकडून जाहिरात; फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे लोकप्रिय असल्याचा उल्लेख
आतापर्यंत राज्याच्या राजकारणात 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)
साडेआठशेची कापसाची बॅग तब्बल 2300 रुपयांना; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'एबीपी माझा'चे स्टिंग ऑपरेशन
राज्यात बोगस बियाणे आणि वाढीव दराने त्याची विक्री करणाऱ्या लोकांविरोधात धाडसत्र सुरू आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांना सोडणार नाही अशी भूमिका कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी स्पष्ट केली आहे. मात्र त्याच अब्दुल सत्तारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. (वाचा सविस्तर)
Mira Road Crime: सरस्वतीची हत्या कीटकनाशकानं? मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेनं कीटकनाशक विकत घेतल्याचं तपासात उघड
मीरारोड हत्याकांडाच्या (Saraswati Vaidya Murder Case) तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. सरस्वती वैद्य यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सरस्वती वैद्य यांच्या हत्येपूर्वी आरोपी मनोज सानेने बोरिवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आले आहे. (वाचा सविस्तर)