Shivsena Advertisement : एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय... देवेंद्र फडणवीस हसले आणि हात जोडून निघून गेले; देवेंद्र फडणवीसांचे सूचक मौन
Devendra Fadnavis On Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांना सर्वाधिक जनतेला मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे अशा आशयाची एक जाहिरात शिवसनेने प्रसिद्ध केली आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर आले, त्यांनी माध्यमांना हात जोडले आणि ते निघून गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या या सूचक मौनाची (Devendra Fadnavis On Shivsena Advertisement) सर्वत्र चर्चा आहे.
देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार अशा आशयाची जाहिरात (Shivsena Survey On CM Eknath Shinde) आज राज्यातल्या प्रमुख वृत्तपत्रात छापून आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं. त्यावरुन आता भाजपमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.
Shivsena Vs BJP : शिवसेना-भाजपमध्ये वाद?
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काहीतरी कुरबोरी सुरू आहेत. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधीलव वाद, सेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू देण्याचा विषय असो किंवा अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात येणारे आरोप असोत, यावरुन दोन्ही पक्षांमध्ये काही ना काही वाद सुरू आहेत. त्यात आज शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचं निमित्त ठरलं.
Devendra Fadanvis Advise to Shiv Sena : देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना सल्ला
दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis on shivsena survey) यांनी बंद दाराआड शिवसेनेच्या मंत्र्यांशी चर्चा केली. आजच्या जाहिरातीवरुन शिवसेना-भाजप युतीत असलेल्या वादाबद्दल यामध्ये चर्चा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावेळी देवेद्र फडणवीसांनी दिला शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी सर्वच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल असं कोणतंही वक्तव्य माध्यमांसमोर करू नका असा सल्ला देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्याची चर्चा आहे.
या सर्व चर्चांवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमचं सरकार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. सर्वच प्रकल्प वेगवान सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने मला आणि देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. आम्ही जनतेचे आभारी आहोत, आमची जबाबदारी वाढली असून आणखी कामं करु.
मात्र हे सर्व घडत असताना शिवसेनेच्या जाहिरातीवर आज फडणवीसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अजूनही शिवसेना भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही याची चर्चा आहे.
Shivsena Survey On CM Eknath Shinde : काय आहे जाहिरातमध्ये?
राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
मतदान सर्वेक्षणानुसार,
भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार,
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार...
ही बातमी वाचा: