SIPRI Report : भारताची तयारी पाहुन उडेल पाकिस्तान अन् 'ड्रॅगन'ची झोप; हद्दीत घुसून थेट हल्ल्याची तयारी
India China Pakistan Relation : सिपरी अहवालात (SIPRI Yearbook 2023) समोर आलं आहे की, एका वर्षात चीनच्या आण्विक साठ्यात वाढ झाली आहे. यासोबतच पाकिस्तानही तसा प्रयत्न करत आहे.
SIPRI Reoprt On Nuclear Weapon : भारत (India) गेल्या काही काळापासून आपलं युद्धकौशल्य आणि युद्धसामग्री वाढवण्यावर भर देत आहे. चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) हे भारताचे 'दुश्मन' असल्याचं जगजाहीर आहे. चीन (India China Relation) आणि पाकिस्तान (India Pakistan Relation) वारंवार कुरापती करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. भारताने ही त्यांना वेळोवेळी चोख उत्तर दिलं आहे. आता चीन आणि पाकिस्तानला भारताचं नाव ऐकून धडकी भरावी असा, अहवाल समोर आला आहे. सिपरी अहवालात समोर आलं आहे की, भारत वेगाने आण्विक हत्यारे विकसित करण्यावर भर देत आहे.
चीन आणि पाकिस्तानला भरेल धडकी
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सीमाभागात कायम आहे. तर, चीन मागून कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. भारताने मागील काही काळात आपल्या रणनितीमध्ये बदल केला आहे. सीमावर्ती भागातील वाढता संघर्ष पाहता भारत आता लांब पल्ल्यांची हत्यारे तयार करण्यावर विशेष जोर देताना दिसत आहे. तसेच भारताने अण्वस्त्र (Nuclear Weapon) तयार करत आण्विक ताकद वाढवण्यावरही भर दिला आहे.
युद्धासाठी सज्ज आहे भारत, अहवाल समोर
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. पीटीआयने सिप्रीच्या अहवालाचा हवाला देत म्हटलं आहे की, भारत आणि पाकिस्तान त्यांच्या अण्वस्त्रांचा विस्तार करत आहेत. यासोबतच अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या नवीन यंत्रणाही विकसित केल्या जात आहेत.
चीनच्या आतमध्ये हल्ला करण्याची भारताची क्षमता
भारत थेट चीनच्या आतील भागात हल्ला करु शकतो. स्वीडनमधील थिंक टँक रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान आण्विक क्षमतेचा वेगाने विस्तार करत आहेत. दोन्ही देशांनी 2022 मध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या नवीन प्रणाली आणि तंत्रज्ञान विकसित केलं असून यापुढेही यासाठी काम सुरु आहे. तसेच, पाकिस्तानचे मुख्य लक्ष भारताच्या अण्वस्त्रांवर आहे, तर भारत लांब पल्ल्याची शस्त्रे विकसित करण्यावर भर देत आहे. ही शस्त्रे थेट चीनच्या आत खोलवर लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत.
आण्विक ताकद वाढवण्याकडे भारताचा कल
भारत सध्या युद्ध कौशल्य आणि युद्धसामग्रीच्या दृष्टीने वेगावे प्रगती करत आहे. भारताने गेल्या काही काळात अणूशक्ती (Nuclear Power) वाढवण्यावर भर दिला आहे. मागील काही वर्षामध्ये भारताने अनेक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे.
चीनची अमेरिकेला टक्कर
सिप्रीने सोमवारी 12 जून रोजी इयरबुक 2023 प्रकाशित केले. गेल्या वर्षभरात चीनचा अण्वस्त्र साठा वाढल्याचं या अहवालात समोर आलं आहे. चीन ज्या पद्धतीने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBMs) बनवत आहे, त्यानुसार दशकाच्या अखेरीस चीन अमेरिका किंवा रशियाला टक्कर देऊ शकेल. सिप्रीच्या अहवालानुसार, 2022 मध्ये चीनच्या आण्विक साठ्यामध्ये 350 शस्त्रे होती, ही संख्या 2023 मध्ये वाढून 410 झाली आहेत. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
World Military Expenditure : जगाचा संरक्षण शस्त्रांवर 183 लाख कोटींचा खर्च... भारताचा किती?