Maharashtra News LIVE Updates : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला - निवडणूक आयोग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित रवार गटाला - निवडणूक आयोग
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित रवार गटाला - निवडणूक आयोग
Maharashtra News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती
Maharashtra News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मॅनेजमेंट कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही सदस्यांची बैठक उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. नाटकाच्या नावाखाली रामाचा अपमान करण्यात आला याचा निषेध म्हणून सभा लावणार उधळून लावणार असा इशारा देण्यात आला.
Pune News : आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर; जोधपूर येथील AIIMC मध्ये उपचार सुरु
Pune News : आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर झाली आहे. आसाराम बापूंवर 13 जानेवारीपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोधपूर येथील AIIMC मध्ये आसाराम बापूंवर उपचार केले जात आहेत. योग वेदांत समितीने आज पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे. सध्या ते कार्डियाक ICU मध्ये आहेत.
Maharashtra News : बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाच्या नॅशनल पार्कमधील जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी
Maharashtra News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प लवकरात सुरू होणार आहे. बोरिवली- ठाणे दीड तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार आहे. बोरिवली-ठाणे भुयारी (बोगदा) मार्गाच्या नॅशनल पार्कमधील जागेची पाहणी आज स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबर अधिकारी वर्गाकडून पाहणी करण्यात आली. मात्र, नॅशनल पार्क परिसरातील पहिल्या टप्प्यातील साधारणपणे 400 ते 500 झोपड्या या मार्गामुळे बाधित होणार असल्याने स्थानिकांकडून नॅशनल पार्कमधील जागा पाहणीला विरोध करण्यात आला. बोरिवलीच्या नॅशनल पार्क परिसरात ज्या ठिकाणी या भुयारी मार्गाला सुरुवात होणार आहे येथील झोपड्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय या कामाला सुरुवात करू नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. मात्र, येथील झोपड्या या म्हाडा, एसआरए तसेच खाजगी जागेवर असल्यामुळे या सर्व यंत्रणांना एकत्रित बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी झोपडीधारकांना दिले. यामुळे झोपडीधारकांचा विरोध आता मावळला आहे. बोरिवली ठाणे हे दीड तासाचे अंतर भुयारी मार्गामुळे वीस मिनिटांवर येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच इंधन बचत देखील होणार आहे.
Chandrapur News : शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून सहलीसाठी नेत असताना ट्रॅक्टरचा अपघात
Chandrapur News : शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून सहलीसाठी नेत असताना ट्रॅक्टरचा अपघात झाल्याने 13 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकाने वरिष्ठांची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. मूल तालुक्यातील मोरवाही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील या विद्यार्थ्यांना काल कन्हाळगाव येथे सहलीसाठी नेण्यात आलं होतं. मात्र, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने चिखली गावाजवळ अपघात झाला ज्यामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला. विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून सहलीसाठी नेणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.