Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pune News : पुणे विद्यापीठ चौकाजवळ मालवाहू ट्रेलर उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
Pune News : पुण्यात अपघाताचं प्रमाण आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण सातत्याने वाढतंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक राजभवनजवळ मालवाहू ट्रेलर उलटला आहे. ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक काही बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ट्रेलर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.
Maharashtra News Live Updates : "ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवताय"; हरिभाऊ राठोडांचे भुजबळ, तायवाडेंवर टीकास्त्र
Maharashtra News Live Updates : ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये म्हणून विरोध करत आहे. यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजात संघर्ष पाहायला मिळतोय. यावरून माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यावर टीका केली आहे. ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवताय, असे त्यांनी म्हटले आहे.
Maharashtra News : उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले म्हणाले; कायदा हातात घेणं चांगलं नाही
Maharashtra News : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, या संदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले, उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता.संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे.मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे.
Maharashtra News Live Updates : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
Maharashtra News Live Updates : 'पोलिसांनी संरक्षणासाठी आपल्याला पिस्तूल दिले आहे. कुणाला मारण्याकरता पिस्तूल आपल्याला दिले नाही. आमदारांनी कुठे मारलं काय मारलं ते मला माहित नाही. जोपर्यंत मी घटनेची पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करणं चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या वादप्रकरणी दिली आहे.
Maharashtra News : गहिनीनाथ गडावर धनंजय मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बांधला फेटा
Maharashtra News : आज संत वामन भाऊ यांची 48 वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी समारोहाला उपस्थित राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे गहिनीनाथ गडावर आले आहेत. प्रथेप्रमाणे संत वामनभाऊ यांची महापूजा धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडली यावेळी प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांचा यावेळी गहिनीनाथ गडा करून सत्कार झाला यावेळी धनंजय मुंडे यांनी स्वतः प्रकाश आंबेडकर यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत केलं धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती.