Maharashtra News LIVE Updates 21th March 2024 : उद्धव ठाकरेंची मिरजेत सायंकाळी जन संवाद सभा, सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा होण्याचा चंद्रहार पाटील यांना विश्वास
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे.
रामदास आठवले यांच्या वाहनाचा साताऱ्यात अपघात
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा साताऱ्यात अपघात झाला आहे. दरम्यान, आम्ही सुखरुप असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, राम सातपुते सागर बंगल्यावर; नगर, माढा आणि साताऱ्याचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर अहमदनगरमधून देखील खासदार सुजय विखे-पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही मतदारसंघातील नाराज झालेल्या नेत्यांची सागर बंगल्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर नाराज नेत्यांची समजूत काढताना दिसत आहेत.
जयंत पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात थोड्याच वेळात जयंत पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.