Maharashtra Live Update : मोठी बातमी : राज ठाकरेंनी उद्या पुन्हा बोलावली बैठक, महायुतीबाबत मोठा निर्णय होणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Lok Sabha Election : शरद पवार गटात नाराजीनाट्य, शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत असून, अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ रावेर वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
Baramati Crime : बारामतीत दांपत्याची हत्या, घटनास्थळी पोलीस दाखल; परिसरात खळबळ
Pune Crime News : बारामतीत दांपत्याचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील जामदार रोडवरील सोसायटीत पती-पत्नीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नेमकी का झाली कशामुळे झाली? याची माहिती पोलीस घेत आहेत. परंतु, बारामती ही सुरक्षित आहे अशी भावना लोकांची असतानाच गेल्या काही दिवसापासून बारामतीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या खुनेच्या घटनेने बारामती शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Maharashtra Live Update : उदय सावंत यांची हिंगोलीत बंद दाराआडा बैठक, नेमका क्या ठरलं?
हिंगोली : मंत्री उदय सावंत आज सलग तिसऱ्या दिवशी हिंगोली लोकसभा मतदारसंघात पोहचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेना आमदार संतोष बांगर , महायुतिचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या समावेत मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआडा बैठक झाली. आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोलीतील कार्यकर्त्याच्या निवासस्थानी बंद दाराआड़ ही बैठक झाली आहे.
Shirur News : गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या; अमोल कोल्हेंकडून कारवाईची मागणी
शिरुर : महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातुन गरोदर असणाऱ्या मातेस व गर्भात असणाऱ्या बालकास उत्तम प्रकारची शक्ती मिळावी यासाठी शासनाचा पोषक आहार म्हणून किट दिले जाते. त्यामध्ये बदाम ,खारीक, काजू गुळ व इतर पौष्टिक आहाराचा समावेश आहे. शासनाचे उद्दिष्ट हे त्या गरोदर मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. तसेच त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच हा उपक्रम आहे. परंतु शिरुर तालुक्यातील आंबळे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन ह्या आहारातील गुळ आणि काजु मध्ये किडे आढळून आले असुन गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचे समोर आले आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंनी उद्या पुन्हा बोलावली बैठक
Raj Thackeray Meeting : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) उद्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यासाठी समन्वयकांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत महायुतीशी संवाद साधण्यासाठी मनसेकडून समन्वयकांची घोषणा केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्या अकरा वाजता ही होणार असल्याची माहिती मिळत आहे.