Maharashtra LIVE Updates : मुंबईतील सी-लिंक आणि कोस्टल रोडला आज गर्डरनं जोडण्याचं काम पहाटेपासून सुरू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
माजी आमदार नारायण पाटलांच्या हाती तुतारी, शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या पक्षात केला प्रवेश केला आहे.
परभणी लोकसभेसाठी आज मतदान, राजेश टोपे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
परभणी लोकसभेसाठी आज मतदान होत असून , राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री राजेश टोपे आणि त्यांच्या पत्नी मनीषा टोपे यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या पाथरवाला या त्यांच्या मूळ गावच्या मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान केलं, राजेश टोपे यांचे विधानसभा क्षेत्र परभणी लोकसभेमध्ये येत असल्याने राजेश टोपे यांनी आज सकाळीच मतदान केले केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केलं.
शरद पवार यांच्या करमाळा येथील जाहीर सभेला सुरुवात
शरद पवार यांच्या करमाळा येथील जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, धौर्यशील मोहिते पाटील, रोहित पवार उपस्थित आहेत.
कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची 28 एप्रिल आणि 1 मे ला सभा, शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची 28 एप्रिल आणि 1 मे ला सभा
28 एप्रिलला आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांची सभा तर
1 मे ला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित कोल्हापूरमध्ये सभा
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून छत्रपती शाहू महाराज रिंगणात तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून खासदार संजय मंडलिक रणांगणात
शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढाच्या रिंगणात
शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढाच्या रिंगणात
माढात रविवारी एकाच दिवशी फडणवीसांच्या तीन सभा
माढा, सांगोला, अकलूज येथे घेणार फडणवीस जाहीर सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदीही ३० एप्रिलला माढ्यात घेणार सभा