एक्स्प्लोर

Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगर : साखळी आंदोलन मागे घेण्याची खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा; नामांतरविरोधी आंदोलनाला धार्मिक रंग देण्यात येत असल्याने आंदोलन स्थगित

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगर : साखळी आंदोलन मागे घेण्याची खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा; नामांतरविरोधी आंदोलनाला धार्मिक रंग देण्यात येत असल्याने आंदोलन स्थगित

Background

17 March Headlines : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे आच चौथ्या दिवशी देखील संप सुरू आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात काल शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती माजी आमदार जे. पी. गावीत यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री आज सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. 

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सभागृहात निवेदन सादर करणार

नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंदमध्ये पोहचला आहे. काल विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत तीन तास सर्व विषयांवर चर्चा झाली आहे. चर्चेनंतर मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार जे पी गावीत यांनी दिली आहे. परंतु, निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर मोर्चा आहे तसाच सुरू राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांसदर्भात सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. 

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे.  जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य जनतेची शासकीय कार्यालयातील कामे अडकून पडल्याने अनेक नागरिक शासकीय कार्यालय येथे फेऱ्या मारत आहेत.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची कोठडी आज संपणार

दारु घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची कोठडी आज संपत आहे. दुपारी 12 वाजता सिसोदीया यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 

केंद्रीय कॅबिनेटची मिटींग

आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधानांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय कॅबिनेटची मिटींग होणार आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीची  

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे.  

कृषी योजनांच्या जागरासाठी आजपासून सांगलीत 3 दिवस कृषी महोत्सव  

कृषी योजनांच्या जागरासाठी आजपासून सांगलीत 3 दिवस कृषी महोत्सव सुरू होत आहे. या कृषी प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थांचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट, पौष्टिक तृणधान्याबाबत आहार तज्ज्ञांचा परिसंवाद, पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

20:47 PM (IST)  •  17 Mar 2023

छत्रपती संभाजीनगर : साखळी आंदोलन मागे घेण्याची खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा; नामांतरविरोधी आंदोलनाला धार्मिक रंग देण्यात येत असल्याने आंदोलन स्थगित

छत्रपती संभाजीनगर : साखळी आंदोलन मागे घेण्याची खासदार इम्तियाज जलील यांनी घोषणा केली आहे. मागील 14 दिवसांपासून आंदोलन सुरू होते; काही संघटनांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नामांतर मुद्द्याला हिंदू मुस्लिम असा करण्यात आल्याने हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जलिल यांनी सांगितले. 

19:30 PM (IST)  •  17 Mar 2023

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रात कोव्हिडच्या ॲक्टिव्ह केसेस पुन्हा एक हजारांहून अधिक, रुग्णसंख्या १ हजार २९ वर

Coronavirus In Maharashtra :  महाराष्ट्रात कोव्हिडच्या ॲक्टिव्ह केसेस पुन्हा एक हजारांहून अधिक, रुग्णसंख्या १ हजार २९ वर पोहचली आहे. 13 नोव्हेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक झाली. आज राज्यात 197 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आज राज्यात 93 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई, पुणे आणि ठाण्यात ॲक्टिव्ह केसेसची संख्या अधिक आहे. 

18:45 PM (IST)  •  17 Mar 2023

विधान परिषदेची विशेष अधिकार समिती जाहीर

विधान परिषदेची विशेष अधिकार समिती जाहीर करण्यात आली आहे. प्रसाद लाड  समितीचे अध्यक्ष आहेत. 

हक्कभंग सूचनांवर कारवाई करणार 

 

17:56 PM (IST)  •  17 Mar 2023

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समिती गठीत करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समिती गठीत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली आहे. या समितीने एका महिन्यात अहवाल सादर करावा अशा देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

16:10 PM (IST)  •  17 Mar 2023

Pune news : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी , ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार

Pune news : पुणेकरांना महापालिकेकडून मिळकतकरात देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम राहणार आहे.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील कॅबिनेटच्या बैठकीत यावर प्रस्ताव आणून मान्यता देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget