Maharashtra News Updates 31 October 2022 : दिंडीतील वरकाऱ्यांवर काळाचा घाला, पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सात वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून सोमवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिन सोहळ्यात सहभागी होणार.
गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
मुंबई- गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
किशोरी पेडणेकर आज दादर पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार
एसआरएच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेते गुजरातला जाणार
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे. आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपा नेत्यांची टीम गुजरातला जाणार आहे , अशी माहिती मिळत आहे. या टीममध्ये 12 आमदार आणि पदाधिकारी अशा एकूण 50 जणांचा समावेश आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत चार कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सकाळी 7 वाजता पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सकाळी 7.15 वाजता मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथून रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवतील. सकाळी 10.30 वाजता संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित करतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील कार्यक्रमात असतील. दुपारी 12 वाजता लोधी रोड येथील सरदार पटेल शाळेत सरदार पटेल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.
इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, दिल्लीत आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाला खर्गे आणि सोनिया गांधी राहणार उपस्थित
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांची जाहीर सभा
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज हिमाचल प्रदेशातील मंडी येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. दुपारी 1.30 वाजता पॅडल ग्राउंड.
केजरीवाल यांचा हरियाणामध्ये रोड शो
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज दुपारी 3 वाजता हरियाणातील बालसमंद, आदमपूर येथे रोड शो करणार आहेत. आदमपूर पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे.
भारतीय नौदलाची चार दिवसीय नौदल कमांडर्स परिषद आजपासून
हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची चार दिवसीय नौदल कमांडर्स परिषद आजपासून सुरू होत आहे.
दिंडीतील वरकाऱ्यांवर काळाचा घाला, पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सात वारकऱ्यांचा मृत्यू
दिंडीतील वरकाऱ्यांवर काळाचा घाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जुनोनीजवळ पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सा वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहेत. तर 8 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
Solapur News Update : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 25 हजार रुपयांची लाच घेताना किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजर रुपये देण्याचे ठरले होते. आज ही रक्कम घेताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतले.
Aditya Thackeray : फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वेगवेगळे, फडणवीसांची माहिती दिशाभूल करणारी: आदित्य ठाकरे
आकड्यांचा खेळ करुन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा असल्याचंही ते म्हणाले. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा असून 2020 साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पांचं गाजर दाखवलं जात आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
राज्यातून बाहेर जात असलेल्या प्रकल्पांवर मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होतं. परंतु, त्याचं उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेरच्या राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला फक्त मोठ्या प्रकल्पांचं गाजर दाखवलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडून उत्तर येणं अपेक्षित होतं, आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद
राज्यातून दोन महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातून प्रकल्प बाहेर का गेले, यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असं ते म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते असं म्हणाले आहेत.