Maharashtra News Live Updates :मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण देण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत,हंसराज अहिर यांचं वक्तव्य
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
उदयनराजे आज रायगडावर, काय भूमिका घेणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी..महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवार करणार आत्मक्लेश-
वढू- बुद्रुक येथे संबाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार आज आत्मक्लेश करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे.
राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर -
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थक राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या हस्ते राजापूर येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राजापूर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि 200 महिलांचा पक्षप्रवेश होणार आहे. गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव पाहता राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा घेतला निर्णय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे असणार लक्ष.
सिनेट निवडणुकीत उडणार धुरळा !!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्या ठाकरे गट सिनेटच्या निवडणूकीच्या तयारीला लागलं आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी गतवर्षी 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यंदादेखील निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी तयारी केली आहे. पण या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची शिंदे गट, मनसे आणि भाजपशी टक्कर असणार आहे. जानेवारीत ही निवडणूक जाहीर होईल.
अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता -
मुंबई- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देण्यात आली होती. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेला सी-समरी रिपोर्ट आधी रद्द करा, मगच नव्यानं तपास सुरू करा अशी मागणी याप्रकरणातील तक्रारदारांनी कोर्टाकडे केली आहे. तक्रारदार माणिकराव जाधव यांच्यावतीनं तसा रितसर अर्जच कोर्टात सादर करण्यात आला असून शालिनीताई पाटील, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीनंही आज कोर्टात तसे अर्ज करण्यात येणार आहेत.
सोलापुरातील हिजामा थेरपी स्पेशलिस्ट तीस वर्षीय तरुण डॉक्टरची आत्महत्या
सोलापुरातील हिजामा थेरपी स्पेशलिस्ट तीस वर्षीय तरुण डॉक्टराने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.डॉ. असद मुन्शी असे मृत तरुण डॉक्टरचे नाव आहे. विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आलीय. मात्र डॉ. असद यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण त्यांनी आपल्या व्हाट्सएपवर अतिशय भावनिक असे स्टेटस ही ठेवल्याचे समोर आले आहे.
काल संध्याकाळी डॉ. असद यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला. एक हसतमुख असे व्यक्तिमत्व आणि सोलापुरात हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुन्शी यांची ओळख होती.
शाळेच्या कमानीवरील टाइल्स मुलाच्या अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू
पक्ष बांधणीच्या आड कुणी आल्यास त्याला तुडवा आणि पुढे व्हा, मी मुंबईतून वकिलांची फौज उभी करतो- राज ठाकरे
लांजा, रत्नागिरी - पक्ष बांधणीच्या आड कुणी आल्यास त्याला तुडवा आणि पुढे व्हा, मी मुंबईतून वकिलांची फौज उभी करतो. लांजा येते कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्ताना दिले आदेश. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाईट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले आहेत.
दौंड शहरात तरुणाची हत्या
दौंड शहरात कोयत्याने सपासप वार करून तरुणाची हत्या, दौंड शहराच्या मध्यभागी झाली हत्या
मयूर चितारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
आरोपी खून करून कोयत्यासहीत पोलिस ठाण्यात झाला हजर
सायंकाळी सात वाजताची घटना