Maharashtra News Updates 28 November 2022 : नवी मुंबईत रेल्वे स्थानकाजवळ दुचाकीला आग, आगीत 42 गाड्या जळून खाक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यपालांबाबतची पुढील दिशा ठरविण्यासाठी खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल भूमिका जाहीर करणार आहेत. त्याशिवाय समता परिषदेकडून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार. महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत..
उदयनराजेंच्या उपस्थितीत पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. कारवाई न झाल्यास 28 नोव्हेंबरला आपण आपली भूमिका स्पष्ट करु असं उदयनराजेंनी जाहीर केलं होतं. उदयनराजेंना अपेक्षित असलेली कारवाई राज्यपाल आणि त्रिपाठी दोघांवरही न झाल्याने सोमवारी 12 वाजता पुण्यातील रेसिडेन्सी क्लबला पुढील दिशा ठरविण्यासाठी उदयनराजेंच्या उपस्थितीत शिवप्रेमी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल आणि त्रिपाठी यांच्याबद्दल भूमिका जाहीर करणार आहेत.
समता परिषदेच्या पुरस्काराचे वितरण
डून देण्यात येणारा यावर्षीचा महात्मा फुले समता जेष्ठ कवी यशवंत मनोहर यांना परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते फुले वाड्यात प्रदान करण्यात येणार. महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
92 नगर परिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे.
महात्मा फुलेंच्या पुणयतिथीनिमित्त कार्यक्रम
आज महात्मा फुलेंची132 वी पुण्यतिथी आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्र लावण्यात येणार आहेत. तैलचित्रांच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. तैलचित्र लावण्याची मागणी छगन भुजबळ यांनी अनेक वर्ष लावून धरली होती.
नाशिकमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू संघटनांचा विराट मोर्चा
धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकरच्या मारेकरी आफताब ला फसवावर लटकवावे, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्ती संघटना, पक्षावर कारवाई करावाई या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून मोर्चा सुरुवात होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात समोर शेवट होणार आहे.
मुंबईत मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद
सरदार सरोवर प्रकल्पाची सत्यता काय यावर मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांची पत्रकार परिषद होणार आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात नर्मदा प्रकल्पाबाबत भाजपकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत ही पत्रकार परिषद होणार आहे.
मुंबईत राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन
राज्यपालांविरोधात छात्रभारतीकडून आंदोलन करण्यात येणार आहे, मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये दुपारी 4 वाजता हे आंदोलन होईल.
मुंबईत गोवरमुळे अंधेरीतील आणखी एक वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू, गोवरमुळे एकूण मृत्यूचा आकडा 14 वर
मुंबईत गोवरमुळे अंधेरीतील आणखी एक वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू, एकूण गोवरमुळे मृत्यूचा आकडा 14 वर, मुंबईत गोवर रुग्णांचा आकडा 303 वर तर मुंबई आणि मुंबई बाहेरील आतापर्यंत एकूण 14 गोवर रुग्णांचा मृत्यू , आज मुंबईत निश्चित निदान झालेले गोवर झालेले रुग्ण- 11
मुंबईतील संशयित रुग्ण-4062
मुंबईत वेब सिरीज तयार करणाऱ्या 17 परदेशी कलाकारांविरोधात गुन्ह्याची नोंद
मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात 17 परदेशी अभिनेते आणि अभिनेत्री विरोधात गुना नोंदवण्यात आला आहे. यात दहा महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.
पुण्यातील रिक्षा चालकांचा संप मागे
10 डिसेंबरपर्यंत बाईक टॅक्सीचालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षाचालकांचा संप मागे
परदेशी महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या ड्रायव्हरला मुंबईच्या डीएननगर पोलिसांकडून अटक
परदेशी महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या ड्रायव्हरला मुंबईच्या डीएननगर पोलिसांनी अटक केली आहे .
परदेशी महिला आपल्या इतर मैत्रिणीसह विमानतळावर सोडण्यास गेली होती त्यासाठी त्यांनी एक भाड्याची कार घेतली .
विमानतळावर मैत्रिणींना सोडल्यानंतर ती महिला एकटीच घराच्या दिशेने जाताना ड्रायव्हर योगेंद्र उपाध्याय ह्याने अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केले.
यावर त्या परदेशी महिलेने पोलिसात त्या ड्रायव्हरच्या विरोधात तक्रार केली . यावर मुंबई च्या डी एन नगर पोलिसांनी त्या ड्रायव्हर च्या विरोधात गुन्हा नोंदवत योगेंद्र उपाध्ये - 40 वर्षे याला अटक केली आहे.
डी एन नगर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून ड्रायव्हर ने अश्या प्रकारची कृत्ये अनेक जणांसोबत केल्याची शक्यता वर्तवली जात आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात प्रकरण सुप्रीम कोर्टात आज बोर्डावर आलंच नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात प्रकरण सुप्रीम कोर्टात आज बोर्डावर आलंच नाही. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य पुन्हा टांगणीवर. आता पुढच्या आठवड्यात नवी तारीख मिळण्याची शक्यता. आज हे प्रकरण टॉप ऑफ द बोर्ड म्हणजे अगदी प्राधान्याने सुनावणीसाठी लिस्ट करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतरही सुनावणी झाली नाही हे विशेष