एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Maharashtra News Updates 25 November 2022 : आमचं सरकार 4 महिन्यांपूर्वी आलं, याचा आनंद महाराष्ट्रातील जनतेला झालाय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 25 November 2022 : आमचं सरकार 4 महिन्यांपूर्वी आलं, याचा आनंद महाराष्ट्रातील जनतेला झालाय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आधुनिक महाराष्ट्राचे जनक असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहेत. तसेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. जाणून घेऊया यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. 

मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर

आज महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कराडमधील प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाला चे उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यानंतर कोल्हापुरातल्या शिरोळला एक कार्यक्रमासाठी उपस्थित रहाणार आहेत.

जालन्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आजपासून पुनर्स्थापना सोहळा 

जालना जिल्ह्यातील समर्थांच्या राम मूर्तीचा आज पुनर्स्थापना सोहळा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात या मूर्तींची चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मूर्ती हस्तगत केल्या. त्याचा आजपासून दोन दिवस पुनर्स्थापन सोहळा होणार आहे. आज राम मूर्तींची मिरवणूक निघणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या नंतर उद्या म्हणजेच 26 नोव्हेंबरला राम मूर्तीची पुनर्स्थापना केली जाणार आहे. 

संजय राऊतांच्या संबंधित ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी
 
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

नागपूरमध्ये अॅग्रो  व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन

नागपूरमध्ये आज ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, नितीन गडकरी आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे. 

नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
 
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता विविध विषयांवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या मैदानाची पाहणी करतील.

नवनीत राणांच्या जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणीच्या वॉरंटवर सुनावणी 
 
बनावट जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप असलेल्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात बजावलेल्या वॉरंटवर शिवडी कोर्टात आज सुनावणी करण्यात येणार आहे. राणा यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

23:25 PM (IST)  •  25 Nov 2022

परभणीच्या जिंतूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त वावर

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घेवंडा चव्हाळी तांडा शिवारात पुन्हा एकदा बिबट्या दिसून आल्याने परिसरातील ग्रामस्थ,शेतकरी भीतीच्या सावटा खाली आलेत,तीन दिवसात दुसऱ्यांदा बिबट्या आढळून आल्याने परिसरात एका पेक्षा अधिक बिबट्यांची संख्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे,चव्हाळी परिसरातून जाणाऱ्या एका वाहन धारकाने  बिबट्याचे व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय,या बिबट्याच्या बाबत अनेक वेळा गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली मात्र वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने हा बिबट्या जनावरांना लक्ष करतोय.त्यामुळे तात्काळ वन विभागाने बिबट्याचे बंदोबस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे...
 
 
 
23:24 PM (IST)  •  25 Nov 2022

महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी येथे काळी शाई फसली

कर्नाटकच्या बसला दौंड येथे काळे फासल्यावर आता कर्नाटकात देखील त्याचे पडसाद उमटले असून कलबुर्गी येथे महाराष्ट्राच्या बसला काळी शाई लावण्यात आली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची  अक्कलकोट अफझलपुर बस थांबवून बसला काळी शाई फसली.बसवर बेळगाव आमचेच,अक्कलकोट, जत आमचेच,महाराष्ट्राचा धिक्कार असो असे लिहिलेली पोस्टर बसवर लावली.लाल पिवळा झेंडा हाती घेतलेल्या एका कार्यकर्त्याने बसवर चढून घोषणाबाजी केली.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत कर्नाटकचे असे वक्तव्य केल्यानंतर सीमाप्रश्नावरून कर्नाटक महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत.
 
23:20 PM (IST)  •  25 Nov 2022

बेळगाव प्रश्नावर लढा देणाऱ्या रामदास कदम यांच्यावर अन्याय का केला?..आमदार योगेश कदम

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे माजी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत हा प्रश्न का हाताळला नाही,असा सवाल आज शिंदे गटातील दापोली-खेडचे आमदार योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.तसेच शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर बेळगाव लढ्यात गुन्हा दाखल झालेला असताना त्यांना पक्षातून बाजूला करण्याचे षडयंत्र केले गेले, त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय होती असा सवाल देखील आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा भाजप-शिवसेना सरकार योग्य पद्धतीने सोडवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
23:19 PM (IST)  •  25 Nov 2022

लेक्ट्रिक वाहणांना सबसिडी देणारे सरकार इलेक्ट्रिक बसला का सबसिडी देत नाही, मुंबई बस मालक संघटनेचा सरकारला सवाल

सरकार टू व्हीलर आणि फोर व्हीलर इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना सबसिडी देते मात्र इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी खाजगी बस मालकांना सबसिडी देत नाही ही मोठी शोकांतिका असल्याचा आरोप मुंबई बस मालक संटनेने केला आहे. ई चलन मुळे होणारे खाजगी बस चालकांचे नुकसान तसेच सरकारच्या विविध धोरणांमुळे होणाऱ्या नुकसानी विरोधात मागण्यांचे निवेदन सरकार पर्यंत पोहचवण्यात येणार असून त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मेळाव्यात देण्यात आला.  मुंबई बस मालक संघटनेतर्फे नेरुळ मधील आगरी कोळी भवन मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सर्व खाजगी बस मालक या मेळाव्यासाठी उपस्थित होते. बस मालकांच्या विविध समस्या राज्य सरकार पर्यंत पोहचविण्याची रणणिती या मेळाव्यात ठरवण्यात आली.

23:18 PM (IST)  •  25 Nov 2022

गुवाहाटी येथे आमदार शांताराम मोरे हजेरी लावणार

शिंदे गटातील सर्वच आमदार हे पुन्हा गुहाटी मध्ये जमणार आहेत उद्या आठच्या फ्लाईटने शिंदे गटातील आमदार व खासदार गुहाटी साठी रवाना होणार आहेत शिंदे गटातील भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील आमदार शांताराम मोरे यांच्याशी चर्चा केली असता त्यानी सांगितले की कामाख्या देवीच्या दर्शनाकरता आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जमणार आहोत तसेच कुटुंबातील सदस्य देखील यामध्ये सहभागी असतील दुसरीकडे याच ठिकाणी जमल्यानंतर सर्व राजकीय घडामोडी घडल्या व ठाकरे सरकार पडलं आणि आता शिंदे सरकार व्यवस्थितपणे सुरू आहे त्याच अनुषंगाने देवीच्या दर्शनाकरता आम्ही गोहाटी येथे जमणार आहोत शिवाय सर्वजण गुवाहाटी मध्ये जमल्यानंतर साहजिकच काही विशेष चर्चा देखील होऊ शकतात दरम्यान पहिल्यांदा आमदार गुहाटी मध्ये जमले होते त्यावेळी शिंदे सरकारने ठाकरे सरकारला एक मोठा धक्का दिला होता आणि आता पुन्हा हे आमदार गुहाटीमध्ये जमत आहेत मात्र यावेळी कोणता धक्का दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget