एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra News Updates 25 December 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 25 December 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आज जगभरात नाताळ सण साजरा करण्यात येणार आहे. भारतामध्ये आजपासून नाताळाच्या सुट्टीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा रेडिओ कार्यक्रम आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 

आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु...
जगभरात ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण साजरा होत आहे. आजपासून ख्रिसमस सुट्ट्या सुरु...पर्यटनस्थळी गर्दी वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. वर्षाअखेर आणि ख्रिसमस यामुळे पर्यटनस्थळावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.  दापोलीत पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. किनाऱ्यावरील सर्व हॉटेल्स फुल झालेली आहेत. चंद्रपूर- ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांनी हाऊस फुल्ल झालाय.  नाशिक- नाताळ आणि विकेंडमुळे नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून अंजनेरी जवळील फ्लॉवर पार्कला चांगलीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यातील इतर पर्यटन स्थळावरही गर्दी होण्याची शक्यता आहे. 

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी -
मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्याचा नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. तसेच, कोरोना टेस्टिंग ट्रेसिंग वाढवणार तर लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.  आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. 

अभिनेत्री तुनिषावर अंत्यसंस्कार -
नायगाव येथील अलिबाबा मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार झीशानच्या मेकअपरुममध्ये तुनिषानं फाशी घेतली.  तुनिषाचे तिचा सहकारी कलाकार झीशान खानसोबत प्रेमसंबंध होते. यातूनच तिनं आत्महत्या केल्याचा तिच्या आईचा आरोप आहे. तिच्या आईच्या तक्रारीवरुन झीशानवर गुन्हा दाखल झाला आहे. तुनिषावर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर आज संध्याकाळी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. 

आनंद परांजपेंना अटक होणार?-
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.  त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय. त्यामुळे आनंद परांजपे यांना पोलीस अटक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 

 भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड -
शिमला- हिमाचलमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची आज निवड होणार आहे. निवडीसाठी केंद्राचे निरीक्षक म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिमल्यात होणाऱ्या बैठकीत नाव जाहीर होणार आहे. 

आज अटलबिहारी वाजपेयींची जयंती.. देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन- 
दिल्ली- अटलबिहारी वाजपेयींच्या समाधी स्थळी सदैव अटल येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, भाजप अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. 

नागपूर- प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आज एक आगळावेगळा उपक्रम राबवत असून नागपूरच्या बी आर मुंडले शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ते आज ५ हजार किलो समरसता भाजी शिजवणार आहेत. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्त समरसता दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी त्यांच्या घरातून थोड्या थोड्या प्रमाणात भाज्या आणतील. त्या चिरुन मग एकत्रित शिजवल्या जातील. म्हणून त्या भाजीला समरसता भाजी अस नाव दिलं आहे.  

अमरावती-  भाजप नेते तुषार भारतीय यांच्या गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अथेलिटिक संस्थेकडून अटल दौड हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत विविध गटांसाठी एकूण ५ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

पंतप्रधान मोदींची मन की बात - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा 96 वा भाग आज प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. कोरोना पार्श्वभीवर, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात यावर पंतप्रधान मोदी बोलण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद, सोलापूर दौरा- 
 औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता जनजागृती मोहिमेत सकाळी अकरा वाजता सहभागी होणार आहेत.   
 
करमाळा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करमाळा येथे आदिनाथ सहकारी साखर कारखाना २७ वा गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे.

राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद- 
राष्ट्रवादीचे नेते रूपाली ठोंबरे रिंकी बक्सला यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राहुल शेवाळे यांच्या संदर्भात काही आरोप केले होते. त्याच आरोपाला उत्तर देण्यासाठी राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद होणार आहे, सी/२, बाळासाहेब भवन , मंत्रालयासमोर, दुपारी १२ वाजता- पत्रकार परिषद होणार आहे. 

 भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
औरंगाबाद- भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार रावसाहेब दानवे, भागवत कराड, अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणार आहे, दुपारी १२.३० वाजता. 

दिल्ली- राहुल गांधी आज शक्ती स्थळ, राजघाट, अटलबिहारी वाजपेयींच्या  समाधी स्थळांवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 

पुणे- संजय शहा हे त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आज ६० किलोमीटर धावणार. संजय शहा हे मॅरेथॉन रनर असून कारगिल मॅरेथॉन आयोजित करतात, पहाटे वाजता शाह धावायला सुरुवात करणार आहे. 

अहमदनगर- नाताळ निमित्त हजारो ख्रिस्त बांधव अतिशय जुन्या आणि ऐतिहासिक ह्युम मेमोरिअल चर्च मध्ये प्रार्थना करणार आहेत. ह्यूम मेमोरियल चर्च हे 1833 साली स्थापन केलेल अतिशय जूनं चर्च आहे. अमेरिकेतून आणलेले बेंच हे या चर्चचे वैशिष्ट आहे. या बरोबरच अमेरिकेतून संपूर्ण भारतात केवळ 5 बेल पाठवण्यात आल्या होत्या

नांदेड- राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत.  

माळेगाव यात्रेची सांगता -
नांदेड- सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेनिमित्त आज लावणी महोत्सव. देशभरातील लावणी कालावंत, कलाकार मंडळी, राजकीय मंडळी, परंपरागत लावणी महोत्सवास लावणार हजेरी. दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. लावणी महोत्सवा नंतर यात्रेची सांगता होणार आहे.  

वाशिम- विविध हिंदुत्ववादी संघटच्यावतीने वाशिम येथे सकल हिंदू समाजातर्फे लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.

भंडारा-  माजी मंत्री महादेव जानकर जिल्ह्यात असणार आहेत. या वेळी पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत.

23:41 PM (IST)  •  25 Dec 2022

शहापुरच्या बिवलवाडी आदिवासी वस्तीततून बिबट्याला जेरबंद करण्यात यश.

ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कसारा थाळघाटावरील बिवलवाडी आदिवासी वस्तीत बिबट्याचा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती शहापूर वन विभागाला दिली व माहिती मिळतात शहापूर वन विभागाचे पथक तसेच एस जी एन पी बचाव पथक शहापूर विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे . हा बिबट्या आठ वर्षाचा असून गेल्या अनेक दिवसांपासून आहार न मिळाल्याने  अशक्त झाल्याने एकाच परिसरात फिरत असावा अशा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करून त्याला उपचारासाठी संजय गांधी नेशनल पार्क या ठिकाणी हलवण्यात आला आहे . बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

23:28 PM (IST)  •  25 Dec 2022

Chandrapur News: चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू.

चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू... कोरपना तालुक्यातील बेलगाव शेतशिवारातील घटना, हल्ल्यात नितीन आत्राम या मुलाचा मृत्यू, हल्ल्यानंतर या भागात भीतीचे वातावरण, आज दुपारी आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या मुलावर बिबट्याचे अचानक केला हल्ला, गेल्या काही दिवसापासून या भागात वाघ-बिबट दर्शन नित्याचे झाल्याने वनकर्मचारी करत होते नियमित गस्त, मात्र त्यादरम्यान झाली दुर्दैवी घटना

23:09 PM (IST)  •  25 Dec 2022

शहापुरच्या बिवलवाडी आदिवासी वस्तीततून बिबट्याला जेरबंद करण्यात यश

ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या कसारा थाळघाटावरील बिवलवाडी आदिवासी वस्तीत बिबट्याचा दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . गावकऱ्यांनी तात्काळ याची माहिती शहापूर वन विभागाला दिली व माहिती मिळतात शहापूर वन विभागाचे पथक तसेच एस जी एन पी बचाव पथक शहापूर विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आहे . हा बिबट्या आठ वर्षाचा असून गेल्या अनेक दिवसांपासून आहार न मिळाल्याने  अशक्त झाल्याने एकाच परिसरात फिरत असावा अशा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. तर या बिबट्याला जेरबंद करून त्याला उपचारासाठी संजय गांधी नेशनल पार्क या ठिकाणी हलवण्यात आला आहे . बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

23:03 PM (IST)  •  25 Dec 2022

नांदेड येथील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेनिमित्त आज लावणी महोत्सव

दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या नावाने बेल भंडारा व खोबरे उधळत, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात पहिल्या दिवशी पालखी महोत्सव संपन्न झाला. दरम्यान कोविड नंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यामुळे भाविक भक्त व व्यावसायिकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावलीय. ज्यात गेल्या चार दिवसांपासून कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, कुस्त्यांच्या दंगली,घोडे,गाढव, उंट, कुत्री यांच्या बाजारासह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत. दरम्यान आज श्री क्षेत्र खंडोबाच्या यात्रे निमित्त लावणी महोत्सवा महोत्सवाचे आयोजन करणयात आले होते.ज्यात महाराष्ट्रासह देशभरातील लावणी कालावंत, कलाकार मंडळी, राजकीय मंडळी, परंपरागत लावणी महोत्सवास हजेरी लावलीय.
 
23:02 PM (IST)  •  25 Dec 2022

खालापूर येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी तरुणाला अटक...

गेल्या आठवडाभरापूर्वी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील जंगल भागात आढळून आलेल्या अल्पवयीन चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये, कारगाव येथील अजय चव्हाण या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 १८ डिसेंबर रोजी खालापूर तालुक्यातील कारगावनजीकच्या जंगलात एका आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. यावेळी, या चिमुरडीचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याने केल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, या मुलीचा मृतदेह हा मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी, या चिमुरडीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड मारून केली असल्याचे समोर आल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर, पोलीसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली असता कारगाव येथील एका संशयित तरुणाकडे कसून चौकशी करण्यात आली. यावेळी, त्याने या चिमुरडीची हत्या केली असून अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केल्याने अजय चव्हाण याला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे. तर, आरोपी अजय याला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित
2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, बाबा वेंगांचं भाकित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोपABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkarwadi Ballot Polling  : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिकाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित
2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, बाबा वेंगांचं भाकित
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
Embed widget