Maharashtra News Updates 24 October 2022 : ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
आज लक्ष्मीपूजन
दिवाळीच्याच दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती अशी मान्यता असून आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विवाह झाला होता. दिवाळीच्या सांयकाळी लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेराची पुजा केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 25 ऑक्टोबर सांयकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे.
दिवाळी पहाट कार्यक्रमात शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ
दहीहंडी, नवरात्र नंतर दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ. आज सकाळी तलावपाळी येथे शिंदे गटातील युवासेनेकडून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जागी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने, राजन विचारे यांनी आपला कार्यक्रम त्याच्याच थोडा पुढे आयोजित केला आहे. तर राजन विचारे यांच्या पुढे चिंतामणी चौकात शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे ठाण्यातील तरुणाईची चंगळ असली तरी राजकीय रस्सीखेच दिसून येणार आहे. दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाईल. तसेच राजकीय सामना देखील रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीची ठाण्यातील दिवाळी पहाट कोणत्याही वादा विना पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग
आज बीएसईचा लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग होईल. संध्याकाळी 6 वाजता प्रे-ओपन सेशन असेल तर संध्या. 6:15 ते संध्याकाळी 7:15 पर्यंत विशेष ट्रेडिंग पार पडेल. दुपारी 3:30 वाजता लक्ष्मीपूजन असणार आहे. तर संध्याकाळी 5 ते 6 मध्ये बीएसईसंदर्भातले विशेष पुरस्कार प्रदान केले जातील.
शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावरती असणार आहेत. आज सकाळी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे शरद पवार अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी गेल्या 8 वर्षांपासून सैनिकांमध्ये दिवाळीचा सण साजरा करत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
बुलढाणा : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाल्याचा आरोप करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी "शेतकऱ्यांची दिवाळी शासनाच्या दारी" हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज जळगाव जामोद उपविभागीय कार्यलयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ येथे प्लास्टिकचे साहित्य असलेल्या गोडाऊनला भीषण आग
अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात प्लास्टिकच्या साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. दरम्यान हे गोडाऊन मानवी वस्तीत असल्याने एकच गोंधळ उडाला आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीचे लोट हे मानवी वस्तीत येत आहेत. कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हे गोडाऊन उभारण्यात आले आहे. शिवाय अनेक भंगार माफीयांनी आपले बस्थान इथे मांडले आहे. त्यांच्यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना इथे वारंवार होत आहेत. या दुर्घटनांमुळे इथला नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या साहाय्याने आग विझवण्यात यश मिळालं आहे. मात्र एखाद्या फटाका उडून या गोडाऊन मध्ये जाऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे, सध्या आग नियंत्रणात असून या गोडाऊन ला कुलिंग करण्याचा काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
नागपूर-पुणे मुंबई रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरले, आज रात्री 10 नंतर एक रेल्वे ट्रॅक सुरू होण्याची शक्यता
नागपूर-पुणे मुंबई रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्यानंतर आज रात्री 10 नंतर एक रेल्वे ट्रँक सुरू होण्याची शक्यता..
रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळपासून रेल्वेचे युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू..
700 पेक्षा अधिक कर्मचारी सकाळपासून दिवाळीच्या दिवशी कामावर हजर..
अमरावतीच्या मालखेड रेल्वे जवळ मालगाडीचे 19 डबे घसरले होते रुळावरून खाली..
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधा झाले आहेत. पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्याने सुनक यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान. https://t.co/npvqdHujNl pic.twitter.com/idG5adyZoZ
— ABP माझा (@abpmajhatv) October 24, 2022
Diwali 2022 : दिवाळी निमित्ताने मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
Diwali 2022 : दिवाळी निमित्ताने आज जळगावच्या बाजारपेठेत विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून या मध्ये मिठाई खरेदीसाठीही मोठी गर्दी दुकानांमध्ये झाली आहे.
मिठाई दुकानात मिठाई खरेदीसाठीही ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
Share Market Muhurat Trading: Sensex 500 अंकांनी वाढला, तर Nifty 17,700 अंकांवर
शेअर बाजारातील आजच्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ होऊन तो 59,877 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 165 अंकांची वाढ होऊन तो 17,742 वर पोहोचला. एल ॲंड टी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, एनडीपीसी आणि महिंद्रा ॲंड महिंद्राच्या समभागात मोठी उसळी झाल्याचं दिसून आलं. तर कोटक बॅंक आणि एचयूएलच्या समभागात मात्र घसरण झाली.