Maharashtra News Updates 24 November 2022 : सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे बालक दगावले, मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 252 वर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि आमदार नितिन देशमुखांसह ( Nitin Deshmukh) इतर काही जणांवर अकोल्याच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काल अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी ( Bhavna Gawli ) यांच्या विरोधात 'गद्दार-गद्दार' अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. याप्रकरणी खासदार विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यावर आज रात्री उशीरा अकोला जीआरपी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, जमाव जमवणे, एकत्रित येऊन घोषणाबाजी करणे, अश्लील भाषेत बोलणे अशा कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.
धक्कादायक! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 80 हजार 865 कोटी रूपयांची फसवणूक
देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहे. त्यापैकी सर्वाधिक 6 हजार 939 प्रकरणे 2020 या करोना काळातील असून सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. महत्वाचं म्हणजे स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत 2017 ते सप्टेंबर 2022 या काळात 634.41 कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली आहे.
अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेतील देशभरातील शाखांमध्ये 2017 मध्ये 2 हजार 324.37 कोटींच्या फसवणुकींची 1 हजार 302 प्रकरणे घडली आहेत. तर 2018 मध्ये 8 हजार 764.77 कोटींच्या फसवणुकींची 2 हजार 591 प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये 34 हजार 628 कोटींच्या फसवणुकींची 5 हजार 488 प्रकरणे, 2020 मध्ये 23 हजार 773.64 कोटींची 6 हजार 939, 2021 मध्ये 6 हजार 132.30 कोटींच्या फसवणूकींची 4 हजार 109 प्रकरणे घडली आहेत. तर 1 जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत 5 हजार 241.93 कोटींच्या फसवणुकीची 2 हजार 293 प्रकरणे घडली आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा प्रवास आता मध्य प्रदेशमध्ये सुरु झाला आहे. मध्य प्रदेशमधील बुरहानपूरमध्ये ही यात्रा पोहोचली असून यावेळी सभेला संबोधित करताना काँग्रेसने राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक जिंकलो, आमचे सरकार होते. पण 20-25 भ्रष्ट आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतले गेले आणि त्यांनी सरकार बनवली.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली कारण सर्व लोकशाही मार्ग बंद होते. लोकसभा बंद पडली, निवडणुकीचा मार्ग बंद झाला आणि माध्यमांचा मार्गही बंद झाला. ते म्हणाले, ते (भाजप) आमदारांना विकत घेतात, माध्यमही त्यांचे आहेत. अशा परिस्थितीत आवाज उठवण्यासाठी काँग्रेसला हा प्रवास सुरू करावा लागला. ते म्हणाले की, सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. आवाज उठवण्याच्या सर्व लोकशाही पद्धती बंद झाल्या. केवळ निवडणुकीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.
सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे बालक दगावले, मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 252 वर
सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे बालक दगावले, मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या २५२ वर
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत साडेचार हजार पदांची भरती
सामान्य प्रशासन विभागाच्या 21.11.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेली गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील पदे भरण्याची प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यास या विभागाचा शासन निर्णय दि. २४.११.२०२२ अन्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील 75 हजार रिक्त पदे भरण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणतः 4500 पदे भरण्यात येणार आहेत.
जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे रद्द झालेल्या गाड्या पूर्ववत
प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेने जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे यापूर्वी रद्द केलेल्या खालील गाड्या पूर्ववत केल्या आहेत.
१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस JCO ५.१२.२०२२
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस JCO 6.12.2022
12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO 4.12.2022
१२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस JCO ५.१२.२०२२
याशिवाय विशेष गाडी क्र. 01266 नागपूरहून 5.12.2022 रोजी 15.50 वाजता सुटेल आणि 6.12.2022 रोजी 10.55 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल (सेवाग्राम गाडीच्या ठिकाणी)
कुठे कुठे थांबणार? : अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळकापूर, जळकापूर, जळगाव, मुर्तिजापूर. चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर)
प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती
Bhiwandi News: भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला
भिवंडी : भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला, हल्ल्यात भाजप नगरसेवक नित्यानंद नाडार जखमी
डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा
वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने कार वर केला हल्ला
ऑफिस मधून बाहेर पडत असताना चढवला हल्ला
लाकडी दंडा व दगडाने गाड्यांची तोडफोड
भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला
भिवंडीत लाहोटी कंपाउंड परिसरात भाजप नगरसेवकावर प्राणघात हल्ला
हल्ल्यात भाजप नगरसेवक नित्यानंद नाडार जखमी
डोक्याला व तोंडाला गंभीर जखमा
वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने कार वर केला हल्ला
ऑफिस मधून बाहेर पडत असताना चढवला हल्ला
लाकडी दंडा व दगडाने गाड्यांची तोडफोड