एक्स्प्लोर

धक्कादायक! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 80 हजार 865 कोटी रूपयांची फसवणूक  

State Bank Of India Fraud : भारतीय स्टेट बँकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहे.

State Bank Of India Fraud : देशातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत 1 जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 80 हजार 865.34 कोटी रूपयांच्या फसवणुकीची तब्बल 22 हजार 722 प्रकरणे घडली आहे. त्यापैकी सर्वाधिक 6 हजार 939 प्रकरणे 2020 या करोना काळातील असून सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. महत्वाचं म्हणजे स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत 2017 ते सप्टेंबर 2022 या काळात 634.41 कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली आहे.  

अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेतील देशभरातील शाखांमध्ये 2017 मध्ये 2 हजार 324.37 कोटींच्या फसवणुकींची 1 हजार 302 प्रकरणे घडली आहेत. तर 2018 मध्ये 8 हजार 764.77 कोटींच्या फसवणुकींची 2 हजार 591 प्रकरणे घडली आहेत. 2019 मध्ये 34 हजार 628 कोटींच्या फसवणुकींची 5 हजार 488 प्रकरणे, 2020 मध्ये 23 हजार 773.64 कोटींची 6 हजार 939, 2021 मध्ये 6 हजार 132.30 कोटींच्या फसवणूकींची 4 हजार 109 प्रकरणे घडली आहेत. तर 1 जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत 5 हजार 241.93 कोटींच्या फसवणुकीची 2 हजार 293 प्रकरणे घडली आहे. 

घोटाळ्यात 610 कर्मचाऱ्यांचा सहभाग 

स्टेट बॅंकेच्या या महा घोटाळ्यात बॅंकेतीलच 610 कर्मचाऱ्यांचा सहभगा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक 175 कर्मचाऱ्यांचा सहभाग 2018 मध्ये होता.  

सार्वजनिक क्षेत्रातील  भारतातील सर्वात मोठी बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील  भारतातील सर्वात मोठी बँक आहे. 1 एप्रिल 2017 रोजी SBI मध्ये पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर ती जगातील 50 सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत सामील झाली आहे. भारतीय बँकिंग इतिहासातील हे सर्वात मोठे विलीनीकरण होते. विलीनीकरणानंतर एसबीआयच्या एकूण 24 हजार शाखा आणि जवळपास 59 हजार एटीएम आहेत. भारताव्यतिरिक्त SBI च्या परदेशातही शाखा आहेत. 37 देशांमध्ये 198 कार्यालये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1806 मध्ये स्थापन झालेल्या बँक ऑफ कलकत्तापासून झाली. ही भारतीय उपखंडातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक होती. ब्रिटिश भारताच्या काळात बँक ऑफ कलकत्ता आणि बँक ऑफ मद्रास यांचे विलीनीकरण करून इम्पीरियल बँक बनवण्यात आली, ज्याचे नाव 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवण्यात आले. भारताची मध्यवर्ती बँक RBI ने 1 जुलै 1955 रोजी इम्पीरियल बँक ताब्यात घेतली.  

महत्वाच्या बातम्या

भावना गवळींविरोधात घोषणाबाजी, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांसह आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget