एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 16 November 2022 : सावरकरांनी स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार: देवेंद्र फडणवीस

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 16 November 2022 : सावरकरांनी स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार: देवेंद्र फडणवीस

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Chandrapur Crime News : मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे झाला वडिलांच्या खुनाचा उलगडा, आई आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे (Crime News) एका खुनाचा तब्बल 3 महिन्यानंतर उलगडा झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरातील ही घटना आहे. मुलीने आईबद्दल असलेले सत्य जगासमोर आणले. काय घडलं नेमकं?

आईने सांगितलेली बाब मुलींनी सत्य मानली

या घटनेबाबत माहिती अशी की, श्याम रामटेके असं 66 वर्षीय मृतकाचं नाव आहे. त्यांचा 3 महिन्यांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हार्ट अटॅकने त्यांचा झोपेत मृत्यू झाल्याचं पत्नीकडून सांगण्यात आलं. रामटेके यांचं वय 66 वर्ष असल्याने सर्वांनी यावर विश्वास देखील ठेवला. आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आल्या. त्यानंतर रीतसर अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहते, यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. सर्व प्रकरण शांत झालं असतांना मात्र या प्रकरणात मोबाईल मुळे एक मोठा ट्विस्ट आला. 

Bharat Jodo: भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिममध्ये; मेधा पाटकर, तुषार गांधी सहभागी होणार, असा आहे आजचा कार्यक्रम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा  (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील वाशिममध्ये असणार आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा 70 वा दिवस तर महाराष्ट्रातील 10 वा दिवस आहे. मंगळवारी या यात्रेने विदर्भात प्रवेश केला असून आज ती वाशिममधील मालेगाव या ठिकाणाहून सुरू होणार आहे. या यात्रेत आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला तेलंगणातून देगलूरमार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाक्यावरुन पैनगंगा नदी ओलांडत भारत जोडो यात्रा मंगळवारी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि विदर्भातील इतर प्रमुख नेते होते. पुढचे पाच दिवशी ही यात्रा विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे. 

Sushama Andhare In Kolhapur : कोणता शेतकरी आपल्या चार्टर विमानाने शेतात उतरतो? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना बोचरा सवाल 

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुरुंदवाड महाप्रबोधन यात्रेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्ला एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला.

त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? मग एवढं कशासाठी बोलता? रिक्षाचालक सांगता, तर शेतकरी मध्येच कोठून आणला? तुम्ही जे सांगता ते, तरी लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या मुलाने जरुर मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण गरीब शेतकऱ्याच्या. एकनाथ भाऊ तुम्ही गरीब शेतकरी आहात का? मुंबईतून जाताना स्पेशल चॅर्टर विमानाने जाता. असा कोणता शेतकरी आहे दाखवा जो चॅर्टरने आपल्या शेतात जातो? एबीपी माझाने याबाबत स्टोरी केली होती. तो माझ्याकडे आता नाही, मी तुम्हाला दाखवतो. त्या पुढे म्हणाल्या एवढं मोठं घर बांधता, रिसाॅर्ट बांधता मग गरीब शेतकरी कसा काय असू शकतो? तुम्ही घराणेशाहीवर बोलता, तर तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात का आणले?

23:12 PM (IST)  •  16 Nov 2022

नवाब मलिक यांच्यावर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल

नवाब मलिक यांच्यावर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल. समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल

20:56 PM (IST)  •  16 Nov 2022

मुंबईताल गोवर आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ, आकडा 164 वर 

मुंबईताल गोवर आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ, आकडा 164 वर 

मुंबई गोवर आजाराचे एकूण 1 हजार 263 संशयित रुग्ण, आज 184 संशयित गोवर रुग्णांची भर 

मुंबईतील रुग्णालयात 80 रुग्णांवर उपचार सुरु, आज रुग्णालयात 12 रुग्ण दाखल 

मुंबई गोवरमुळे आज एकही मृत्यूची नोंद नाही, आतापर्यंत गोवरमुळे 7 संशयित रुग्णांचा मृत्यू

19:46 PM (IST)  •  16 Nov 2022

संजय राऊत यांना ईडी कडून पुन्हा एकदा चौकशी साठी हजर राहण्याची नोटीस

संजय राऊत यांना ईडी कडून पुन्हा एकदा चौकशी साठी हजर राहण्याची नोटीस

संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टातून जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट ठेवण्यात आली होती

त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे, आणि त्याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे

18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे

19:44 PM (IST)  •  16 Nov 2022

Devendra Fadanvis: सावरकरांनी स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार: देवेंद्र फडणवीस

काँग्रेस नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल चुकीचं बोलत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याआधी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले. 

19:31 PM (IST)  •  16 Nov 2022

'एबीपी माझा'च्या बातमीनंतर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची उचलबांगडी

अखेर 'एबीपी माझा'च्या बातमी नंतर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची उचलबांगडी

धनराज माने यांच्यावर आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणी संबंधित कामकाजाची जबाबदारी

माने यांच्याबाबत जे जे रूग्णालयाने दिलेला अहवाल एबीपी माझाने दाखवल्यानंतर अखेर उच्च शिक्षण विभागाची कारवाई

माने उजव्या डोळ्याने अंध असुन डाव्या डोळ्याने त्यांना केवळ 10 टक्के दिसत असल्याचा जे जे रुग्णालयाचा अहवाल

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवेTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP MajhaMumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पणABP Majha Headlines : 5.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Embed widget